IND vs ENG 2nd Test Day 3 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलने जबरदस्त पुनरागमन करत टीकाकारांच्या मुसक्या आवळल्या. त्याने भारताच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले.
गिलने 11 महिन्यांनंतरकसोटीत शतक झळकावले आहे. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. भारतीय क्रिकेटचा ‘प्रिन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभमनने इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या डावात 104 धावा केल्या. त्याने 147 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार आणि दोन षटकार मारले.
𝙃𝙐𝙉𝘿𝙍𝙀𝘿 𝙛𝙤𝙧 𝙎𝙝𝙪𝙗𝙢𝙖𝙣 𝙂𝙞𝙡𝙡! 💯
A glittering knock as he completes his 3rd Test Century 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/z33eaw2Pr5
— BCCI (@BCCI) February 4, 2024
शुभमनने यापूर्वी मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्फोटक शतक झळकावले होते. यादरम्यान त्याने 235 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 128 धावांची खेळी खेळली होती. यानंतर खेळलेल्या 12 डावांमध्ये त्याची बॅट शांत राहिली. त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्याने 12 डावात 13, 18, 6, 10, 29*, 2, 26, 36, 10, 23, शून्य, 34 धावा केल्या. हैदराबाद कसोटीत तर तो शून्यावर बाद झाला, त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले.
शुभमनने केली विशेष कामगिरी…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शुभमनचे हे 10 वे शतक आहे. वयाची 25 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्याने ही विशेष कामगिरी केली. त्याच्या आधी फक्त दोनच फलंदाज भारतासाठी अशी कामगिरी करू शकले होते. सचिन तेंडुलकरने 25 वर्षांचा होण्यापूर्वी 273 डावांमध्ये 30 शतके झळकावली होती. तर विराट कोहलीने 163 डावात 21 शतके झळकावली होती.
Virat Kohli-Anushka Sharma : विराट होणार दुसऱ्यांदा पिता, एबी डिव्हिलियर्सने दिली माहिती…
घेतला होता ‘हा’ निर्णय..
शुभमनने नुकतेच ओपनिंग सोडून तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा निर्णय घेतला होता, पण तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही. पण आज या सामन्यात गिलने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून चाहत्यांची मने जिंकली. त्याने हे शतक 132 चेंडूत पूर्ण केले.