\n

दरम्यान, याआधी सकाळी पहिल्या सत्रात भारताचा पहिला डाव 436 धावांवर संपला. भारताकडून रवींद्र जडेजाचे शतक हुकले. तो 87 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर केएल राहुलने 86 धावांची खेळी केली. इंग्लंडच्या सर्व 10 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या. जो रूटने चार विकेट घेतल्या. जो रूटचा कसोटीतील हा दुसरा सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल आहे. यापूर्वी 2021 मध्ये त्याने अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध आठ धावांत पाच बळी घेतले होते.

\n

 पोपचे शतक, इंग्लंडचे दमदार पुनरागमन….

\n

ऑली पोपचे शतक इंग्लंडसाठी संजीवनी देणार ठरले. पोपच्या शतकापूर्वी इंग्लंडचा संघ जवळपास सामन्यातून बाहेर पडला होता, मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे.  दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने चांगल्या गतीने धावा काढण्यास सुरुवात केली, पण सतत पडणाऱ्या विकेट्स हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरला.  पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ओली पोपनं एक बाजू संभाळत इंग्लंड संघाला पुन्हा सामन्यात आणले.

\n

बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने इंग्लंडला 45 धावांची सुरुवात करून दिली. भारताला पहिले यश आर अश्विनने 10व्या षटकात जॅक क्रॉलीच्या रूपाने मिळवून दिले. जो 33 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर 19व्या षटकात जसप्रीत बुमराहने बेन डकेटला आपला बळी बनलवला. बुमराहने डकेटला क्वीन बोल्ड करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चांगली खेळी खेळणारा डकेट 7 चौकारांच्या मदतीने 47 धावा करून माघारी परतला. त्यानंतर फिरकी खेळण्यात माहिर म्हटला जाणारा जो रूट 21व्या षटकात संघाची धावसंख्या 117 असताना केवळ 02 धावा काढून बाद झाला. यानंतर 28व्या षटकात धावसंख्या 140 असताना अश्विनने जॉनी बेअरस्टोला 10 धावांवर बाद केले. त्यानंतर काही वेळाने म्हणजेच 37व्या षटकात धावसंख्या 163 असताना कर्णधार बेन स्टोक्सही (06) अश्विनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड होत माघारी परतला.

\n

यानंतर ओली पोप आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बेन फॉक्सने जबाबदारी स्वीकारली आणि सहाव्या विकेटसाठी 112 धावांची (183 चेंडू) भागीदारी केली. अक्षर पटेलने 67व्या षटकात इंग्लंड संघाची धावसंख्या 275 झाली असताना फॉक्सला बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि ही जोडी तोडली. फॉक्सने संयमी खेळी खेळली आणि 81 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. यानंतर ओली पोपने रेहान अहमदसोबत भागीदारी रचली, ती दिवसअखेरपर्यंत कायम राहिली. दोघांनी 7व्या विकेटसाठी 14* (62 चेंडू) धावा जोडल्या.

\n

अशी होती भारताची गोलंदाजी…

\n

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून आतापर्यंत जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले आहेत. याशिवाय अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 1 यश मिळाले आहे.

\n

Ranji Trophy 2024 : तन्मय अग्रवालची मॅरेथॉन इनिंग संपली, एकाच डावात मोडले अनेक विश्वविक्रम…

\n

\n

भारताचा डाव 436 वर आटोपला…

\n

तिसऱ्या दिवशी म्हणजे आज भारताने सात विकेट्सवर 421 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि 15 धावा जोडण्यासाठी उर्वरित तीन विकेट गमावल्या. भारताला आजचा पहिला धक्का जो रूटने दिला. त्याने डावाच्या 120 व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. सर्वप्रथम रूटने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो 180 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 87 धावा करून बाद झाला.

\n

त्याचवेळी पुढच्याच चेंडूवर जसप्रीत बुमराह क्लीन बोल्ड झाला. बुमराहला खातेही उघडता आले नाही. रेहान अहमदने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव 436 धावांवर संपुष्टात आणला. अक्षरने 100 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 44 धावांची खेळी केली.

\n

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी)ही रूटने पहिली विकेट घेतली होती. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या यशस्वी जैस्वालला त्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. यशस्वीला 74 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 80 धावा करता आल्या. त्याचवेळी राहुलचेही शतक हुकले. त्याने 123 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 86 धावांची खेळी केली. केएस भरत 41 धावा, अश्विन एक धावा, श्रेयस अय्यर 35 धावा, शुभमन गिल 23 धावा आणि कर्णधार रोहित शर्मा 24 धावा करून बाद झाला. इंग्लंडकडून रुटने सर्वाधिक चार विकेट घेतल्या, तर टॉम हार्टले आणि रेहानने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जॅक लीचने एक विकेट घेतली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IND vs ENG 1st Test Day 3 Stumps : उपकर्णधार ओलीचे झुंझार शतक, दुसऱ्या डावात इंग्‍लंडची भारतावर 126 धावांची आघाडी…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/engs.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-1st-test-stumps-on-day-3-in-hyderabad-england-reach-316-6-with-a-lead-of-126-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/engs.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-1st-test-stumps-on-day-3-in-hyderabad-england-reach-316-6-with-a-lead-of-126-runs#webpage","name":"IND vs ENG 1st Test Day 3 Stumps : उपकर्णधार ओलीचे झुंझार शतक, दुसऱ्या डावात इंग्‍लंडची भारतावर 126 धावांची आघाडी…","url":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-1st-test-stumps-on-day-3-in-hyderabad-england-reach-316-6-with-a-lead-of-126-runs","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-1st-test-stumps-on-day-3-in-hyderabad-england-reach-316-6-with-a-lead-of-126-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/engs.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-1st-test-stumps-on-day-3-in-hyderabad-england-reach-316-6-with-a-lead-of-126-runs#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-1st-test-stumps-on-day-3-in-hyderabad-england-reach-316-6-with-a-lead-of-126-runs","name":"IND vs ENG 1st Test Day 3 Stumps : उपकर्णधार ओलीचे झुंझार शतक, दुसऱ्या डावात इंग्‍लंडची भारतावर 126 धावांची आघाडी…"}}]}}}

IND vs ENG 1st Test Day 3 Stumps : उपकर्णधार ओलीचे झुंझार शतक, दुसऱ्या डावात इंग्‍लंडची भारतावर 126 धावांची आघाडी…