IND vs ENG 1st Test : भारताला 80 धावांवर पहिला धक्का! 24 धावा करून रोहित माघारी, यशस्वीचे तूफानी अर्धशतक….

IND vs ENG 1st Test Live Cricket Score : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिली कसोटी आजपासून हैदराबादमध्ये खेळवली जात आहे. विराट कोहली पहिल्या दोन कसोटीतून बाहेर पडला आहे. वैयक्तिक कारणामुळे त्यांनी नाव मागे घेतले होते. तसेच प्रशिक्षक द्रविडने केएल राहुलला यष्टीरक्षणाच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे. अशा परिस्थितीत केएस भरतला स्पेशालिस्ट यष्टिरक्षक म्हणून प्लेइंग-11 मध्ये संधी देण्यात आली आहे. ध्रुव जुरेलला पदार्पणाची वाट पाहावी लागणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर इंग्लंड संघाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी पहिला डावात 246 धावांवर संपला.
IND vs ENG Live Score : रोहित शर्मा बाद…
भारताला 12.2 षटकात 80 धावांवर पहिला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कर्णधार रोहित शर्माने आपली विकेट गमावली. तो जॅक लीचकरवी स्टोक्सच्या हाती झेलबाद झाला. त्याला 27 चेंडूत 24 धावा करता आल्या. यशस्वी जैस्वालने तुफानी फलंदाजी केली. अर्धशतक झळकावल्यानंतर तो क्रीजवर आहे. शुभमन गिल नुकताच क्रीजवर आला आहे.
He has raced past FIFTY! 👏 👏
This has been a blitz of a knock from @ybj_19 to notch up his 2⃣nd Test half-century ⚡️ ⚡️
Follow the match ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Pail01CRRw
— BCCI (@BCCI) January 25, 2024
IND vs ENG Live Score : यशस्वीचे अर्धशतक…
यशस्वी जैस्वालने 47 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे अर्धशतक होते. यशस्वी तुफानी फलंदाजी करत असून त्याने आतापर्यंतच्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले आहेत.
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर इंग्लंड संघाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी पहिला डावात 246 धावांवर संपला. बेन स्टोक्सने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि 70 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या तर बुमराह आणि अक्षर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.





