IND vs BAN 1st T20 : हार्दिक-सूर्याची दमदार खेळी, टीम इंडियाचा बांगलादेशवर शानदार विजय…

India vs Bangladesh 1st T20 Match Result : – बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर टीम इंडियाची नजर आता टी-20 मालिकेवर आहे. आगामी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर पार पडला.
भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात कसोटीप्रणाणेच चमकदार कामगिरी केली. अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती या गोलंदाजांनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे भारतीय संघाने ग्वाल्हेर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा सात विकेट्स राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Bangladesh Tour of India 2024
India 🆚 Bangladesh | 1st T20iMatch Result | India won by 7 wickets#BCB #Cricket #INDvBAN #T20 pic.twitter.com/zPVQbrb8wi
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 6, 2024
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 19.5 षटकांत 127 धावसंख्येवरच आटोपला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 11.5 षटकांत तीन गडी गमावून 132 धावा करून सामना जिंकला. भारताकडून सर्वाधिक धावा हार्दिकने केल्या. त्यानं 16 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 36 धावा केल्या. हार्दिकशिवाय कर्णधार सूर्यकुमारनेही आक्रमक फलंदाजी करत 14 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. पहिला सामना खेळणारा नितीश रेड्डीही 15 चेंडूत 16 धावा करून नाबाद परतला.
याव्यतिरिक्त सलामीवीर म्हणून आलेला सॅमसन याने 19 चेंडूत 29 धावांची खेळी केली तर दुसरा सलामीवीर अभिषेक शर्मा झटपट धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्यानं 7 चेंडूत 2 चौकार अन् 1 षटकारासह 16 धावा केल्या. बांगलादेशकडून गोलंदाजीत मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रहमान याने 3 षटकात 36 तर मिराजने 1 षटकात 7 धावा दिल्या. याव्यतिरिक्त एकाही गोलंदाजांला बळी मिळवण्यात यश आले नाही.
तत्पूर्वी , बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांनी भारतासाठी पदार्पण केले. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने बांगलादेशचा डाव 19.5 षटकांत 127 धावांत संपुष्टात आला.
Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियानं पुन्हा मारलं मैदान, पाकचा 6 विकेट्स राखून केला पराभव…
बांगलादेशकडून मेहदी हसन मिराझने 32 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद सर्वाधिक 35 धावा केल्या. कर्णधार नजमुलने 25 चेंडूंचा सामना करत 27 धावा केल्या. तौहीद आणि तस्किन अहमद प्रत्येकी 12 धावा करून बाद झाले. याशिवाय कोणीही विशेष काही कामगिरी करू शकले नाही.
अर्शदीपने बांगलादेशला सुरुवातीचे धक्के दिले ज्यातून संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही आणि त्याची फलंदाजी खूपच खराब झाली. तीन वर्षांनंतर भारतासाठी टी-20 सामना खेळून परतलेल्या वरुणने पुनरागमन करताना छाप पाडली, तर अर्शदीपनेही तगडी गोलंदाजी करत बांगलादेशला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. मयंक यादवने आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिलेच षटक निर्धाव टाकले आणि एक विकेट घेण्यातही तो यशस्वी ठरला. एकूणच या सामन्यात भारतीय गोलंदाजी उत्कृष्ट होती.
भारताकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग यांनी भारतासाठी घातक गोलंदाजी केली. अर्शदीपने 3.5 षटकात 14 धावा देत 3 बळी घेतले. वरुणने 4 षटकात 31 धावा देत 3 बळी घेतले. हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि मयंक यादव यांनीही प्रत्येकी 1 बळी घेतला.





