Women’s T20 World Cup 2024 (IND vs PAK) : सामना जिंकला असला तरी भारताचं सेमीफायनलचं गणित अधिक बिकट, जाणून घ्या समीकरण….

Women’s T20 World Cup 2024 (IND W vs PAK W Match Result) : महिला टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील सातव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 106 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने 18.5 षटकांत 4 गडी गमावून सामना जिंकला.
भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला फक्त 105 धावांवर रोखलं. पण फलंदाजांना सामना लवकर संपवता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या नेट रननेटवर हवा तसा परिणाम झाला नसल्याचं दिसून येतंय. खरं तर नेट रनरेट सुधारण्यासाठी भारताला हे आव्हान 12 षटकात पूर्ण करणं गरजेचं होतं. पण भारतीय संघ पूर्णपणे दबावात असल्याचं दिसला. एकवेळ टीम इंडिया जिंकेल की नाही याबाबतच सांशकता होती. पण भारताने 19व्या षटकात पाकिस्तानने दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि विजय मिळवला.
टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवची धूळ जरी चारली असती ती वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडिया ‘अ’ गटात आहे. सध्याची ‘अ’ गटाची परिस्थिती पाहता टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचेल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. भारताने पाकिस्तानला पराभूत करून 2 गुण मिळवले असले तरी पाकिस्तानचा संघ नेट रनरेटच्या बाबतीत भारतापेक्षा वरचढ ठरला आहे.
पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडिया पाईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी पोहोचली आहे. दोन अंकासह इंडियाचा नेट रननेट -1.217 झाला आहे. तर पाकिस्तान दोन गुणांसह +0.555 नेट रननेटसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे सेमीफायनलचं गणित अधिक बिकट होत चाललंय.
A leap past Pakistan, but only one tiny NRR crawl for India pic.twitter.com/1R3Of59Ts8
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 6, 2024
न्यूझीलंड,ऑस्ट्रेलिया यांनी विजयी सलामी देत 2 गुणांसह गणुतालिकेत अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडचा रनरेट +2.900 तर ऑस्ट्रेलियाचा रनरेट +1.908 इतका आहे. तर गुणतालिकेत श्रीलंका दोन सामन्यातील पराभवानंतर -1.667 रनरेटसह पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियानं पुन्हा मारलं मैदान, पाकचा 6 विकेट्स राखून केला पराभव…
भारताचं उपांत्य फेरी गाठायची झाली तर सर्व गणित हे भारत-ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड या सामन्यावर आहे. या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं गरजेचं आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केलं तरच भारताचं उपांत्य फेरीचं गणित सुटू शकतं. कारण भारताचा नेट रनरेट खूपच खराब आहे. आता भारताचा पुढचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना जिंकणं गरजेचं आहेच. त्यासोबत नेट रनरेटही चांगला ठेवावा लागणार आहे.





