#INDvsBAN | ‘त्या’ कारणामुळे विराट कोहलीवर कारवाई होण्याची शक्यता

ढाका – भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याला बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या ( IND vs BAN ) कसोटीत केलेल्या गैरवर्तनामुळे कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. क्षेत्ररक्षणासह फलंदाजीतही अपयशी ठरलेल्या कोहलीने बांगलादेशचा क्रिकेटपटू व नवोदित फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामशी मैदानावरच वाद घातला.
जयदेव उनाडकटसाठी पंतने केलेल्या ‘या’ कामाची सर्वत्र चर्चा; चाहत्यांकडून जोरदार कौतुक!
त्यात बांगलदेशचा कर्णधार शकीब अल हसन व मैदानावरील पंचांनी हस्तक्षेप करत हा तंटा सोडवला. मात्र, कोहलीने मोमिनुलशी वाद घालत केलेले गैरवर्तनच त्याला आता भोवणार आहे. मेहदी हसनच्या गोलंदाजीवर बाद होऊन परतत असलेल्या कोहलीला उद्देशून तैजुल काहीतरी बडबडला. यावर कोहलीने दुर्लक्ष करण्याच्या ऐवजी त्याच्याजवळ जात वाद घातला.
#INDvsBAN । सामन्यात OUT करणाऱ्या गोलंदाजाला विराटने स्वतःची जर्सी भेट दिली
या डावात कोहलीने तब्बल 22 चेंडू खेळत अवघी एक धाव केली. स्वतःच्या अपयशावर संतापलेल्या कोहलीने तैजुलशी विनाकारण वाद घातल्याचे दिसत होते. आता हा सामना संपला असला तरीही आयसीसीकडून कोहलीवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





