IND vs BAN 1st T20 : टीम इंडियानं बांगलादेशविरूध्द Toss जिंकला, कर्णधार सूर्यानं घेतला ‘हा’ निर्णय…

India vs Bangladesh 1st T20 Toss Update : – बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर टीम इंडियाची नजर आता टी-20 मालिकेवर आहे. आगामी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे. या दोघांमधील पहिला सामना आज ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल, ज्यामध्ये भारतीय संघ विजयासह 1-0 अशी आघाडी घेण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.
भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) तर बांगलादेशचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे (Najmul Hossain Shanto)असेल. या मालिकेनंतर न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याने या मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. शाकिबने निवृत्ती जाहीर केल्यानंतर बांगलादेशचा संघ प्रथमच टी-20 मालिका खेळणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश : Toss Update
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. (India won the toss and Elected to Field) त्यामुळे बांगलादेशला प्रथम फलंदाजासाठी मैदानात उतरावं लागेल.
🚨 Toss Update 🚨
Captain @surya_14kumar has won the toss and #TeamIndia elect to field in Gwalior 👌👌
Live – https://t.co/Q8cyP5jXLe#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/JbtMpCgXFX
— BCCI (@BCCI) October 6, 2024
भारत विरुद्ध बांगलादेश : हेड टू हेड रेकाॅर्ड….
दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकाॅर्डबदल बोलायचे झाले, तर भारताने बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत 14 पैकी 13 सामने जिंकले आहेत. बांगलादेशला फक्त एकच विजय मिळाला होता, जो 2019 मध्ये दिल्लीत त्यांनी मिशवला होता.
भारतात हा सामना कुठे बघायचा…
भारत विरुद्ध बांगलादेश टी20 मालिकेचे थेट प्रसारण जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर केले जाईल, तर थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 चॅनल 1 आणि स्पोर्ट्स 18 चॅनल 1 एचडी वर केले जाईल.
Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियाला मिळणार पहिला विजय! पाकनं दिलं माफक धावांचे लक्ष्य…
भारत vs बांग्लादेश : टी20 सीरीज वेळापत्रक….
पहिला टी 20 : 6 ऑक्टोबर, संध्याकाळी 7 वा., ग्वालियर
दूसरा टी 20 : 9 ऑक्टोबर,संध्याकाळी 7 वा., नवी दिल्ली
तिसरा टी 20 : 12 ऑक्टोबर, संध्याकाळी 7 वा., हैदराबाद





