IND vs AUS : ना धावा झाल्या, ना नेतृत्त्वाची छाप! गिलच्या नावावर झाली ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

Shubman Gill Shameful Record as Captain 1st Match : ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतीय क्रिकेट संघासाठी एकदिवसीय मालिकेची सुरुवात निराशाजनक ठरली. पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 7 गडी राखून सहज पराभूत केले. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 26-26 षटकांचा करण्यात आला होता. भारतीय फलंदाजांचा खराब प्रदर्शनामुळे संघाला 26 षटकांत केवळ 136 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 131 धावांचे लक्ष्य अवघ्या 21.1 षटकांत 3 गडी गमावून सहज गाठले.
गिलच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद –
शुबमन गिलची फलंदाजी अपयशी ठरलीच, शिवाय त्याच्या कर्णधारपदालाही विशेष चमक दाखवता आली नाही. पर्थमधील हा पराभव त्याच्यासाठी अत्यंत निराशाजनक ठरला, कारण हा त्याचा एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता. यापूर्वी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधील त्यांच्या पहिल्या सामन्यातही गिलला पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे विराट कोहलीनंतर तो तिन्ही फॉर्मेचमध्ये पहिल्या सामन्यात पराभव पत्करणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला.
Shubman gill #ShubmanGill #india #indiancricket #captain pic.twitter.com/ihRG61STHD
— RVCJ Sports (@RVCJ_Sports) October 19, 2025
फलंदाजांचे निराशाजनक प्रदर्शन; राहुल-अक्षरची झुंज –
भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. रोहित शर्मा केवळ 8 धावांवर बाद झाला, तर शुबमन गिल 10 धावांवर नॅथन एलिसचा बळी ठरला. विराट कोहली शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, तर श्रेयस अय्यरने 24 चेंडूंमध्ये 11 धावा केल्या. अशा बिकट परिस्थितीत केएल राहुल (38 धावा) आणि अक्षर पटेल (31 धावा) यांनी पारी सावरत काहीसा प्रतिकार केला. शेवटी नीतीश कुमार रेड्डीने 11 चेंडूंमध्ये 19 धावांची छोटी खेळी करत संघाला 136 धावांपर्यंत पोहोचवले.
हेही वाचा – IND W vs ENG W : मंधाना-कौरची खेळी ठरली व्यर्थ, भारताने गमावला जिंकलेला सामना, इंग्लंड सेमीफायनलमध्ये दाखल
गोलंदाजांनाही दाखवता आली नाही चमक –
A similar start 😐#AUSvIND #ViratKohli #ShubmanGill pic.twitter.com/DoHNr8lNQj
— Cricbuzz (@cricbuzz) October 19, 2025
पावसामुळे हा सामना प्रत्येकी 26 षटकांचा करण्यात आला होता. छोट्याशा लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही आणि 21.1 षटकांतच विजय मिळवला. मिचेल मार्शने नाबाद 46 धावांची खेळी केली, तर जोश फिलिपने 37 धावांचे योगदान दिले. भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले, आणि हा सामना एकतर्फी ठरला.
हेही वाचा – Pakistan Afghanistan War : तीन अफगाणी क्रिकेटपटूंच्या मृत्यूनंतर आयसीसीचे निवेदन, पाकिस्तानचा संताप!
ऑक्टोबरमध्ये पुन्हा तुटला विजयी सिलसिला –
2025 मध्ये भारताने सलग 8 एकदिवसीय सामने जिंकले होते, परंतु पर्थमध्ये हा विजयी सिलसिला खंडित झाला. विशेष म्हणजे, ऑक्टोबर हा महिना भारतीय संघासाठी यापूर्वीही काही वेळा अशुभ ठरला आहे. यापूर्वी 1978 आणि 1991 मध्येही या महिन्यात भारताचा विजयी सिलसिला तुटला होता.





