IND vs AUS : रोहितला दुसऱ्या वनडेतून डच्चू? जैस्वालला मिळणार संधी! VIDEO व्हायरल झाल्याने चर्चेला उधाणं

रोहितचा मूड आणि बॉडी लँग्वेज चर्चेत –
अॅडलेड येथील पर्यायी सराव सत्रादरम्यान रोहित शर्मा नेहमीच्या उत्साही स्वभावापेक्षा वेगळा दिसला. सरावासाठी तो सर्वात आधी नेट्समध्ये पोहोचला आणि जोरदार सरावही केला. मात्र, व्हिडिओ फुटेज आणि उपस्थित पत्रकारांच्या मते, रोहितचा मूड आणि बॉडी लँग्वेज यावेळी नेहमीसारखी नव्हती. सहसा सहकारी खेळाडू, माध्यमे आणि चाहत्यांशी संवाद साधणारा रोहित या वेळी एकटा आणि शांत दिसला. सरावानंतरही तो कोणाशी फारसा बोलला नाही, ज्यामुळे त्याला दुसऱ्या वनडेतून वगळण्याची चर्चा सुरू झाली आहे.
यशस्वी जैस्वालला संधी मिळणार?
Ajit Agarkar and Gautam Gambhir in a long animated chat with backup opener #YashasviJaiswal after #RohitSharma walked off towards the team hotel. Is this the sign of the future?@CricSubhayan and @rohitjuglan discuss.@ThumsUpOfficial #AUSvIND #AUSvIND pic.twitter.com/QZ6aVvYgdm
— RevSportz Global (@RevSportzGlobal) October 22, 2025
अॅडलेड येथील सराव सत्रादरम्यान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि निवडकर्ता शिवसुंदर दास यांनी युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, ही चर्चा रोहित शर्मा मैदानाबाहेर पडल्यानंतर झाली. यशस्वीनेही मंगळवारी नेट्समध्ये बराच वेळ फलंदाजीचा सराव केला. यामुळे यशस्वी जैस्वाल रोहित शर्माची जागा घेईल का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
हेही वाचा –Gautam Gambhir : काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांचा गौतम गंभीरवर खळबळजनक आरोप; म्हणाल्या…
रोहितच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह –
रेव्हस्पोर्ट्झ ग्लोबलच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा अॅडलेडमध्ये खूपच उदास आणि वेगळ्या मूडमध्ये दिसला. असेही सांगितले जाते की, रोहितला कर्णधारपद सोडायचे नव्हते, परंतु निवडकर्त्यांनी शुबमन गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. पर्थ येथील पहिल्या वनडेत रोहितची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्यामुळे आता अॅडलेड वनडेत त्याला संधी मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – West Indies : वेस्ट इंडिजचा वर्ल्ड रेकॉर्ड ! वनडे इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय –
रोहित शर्माच्या बॉडी लँग्वेज आणि सराव सत्रातील वर्तनामुळे निवडकर्त्यांनी त्याला त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याबाबत सूचित केले आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. रोहितला वगळून यशस्वी जैस्वालला संधी देण्याच्या चर्चांनी जोर धरला असून, दुसऱ्या वनडेत नेमके काय होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





