Independence Day : ‘माझा देश, माझी ओळख…’, गौतम गंभीरसह विराट कोहलीच्या स्वातंत्र्य दिनाच्या पोस्टने वेधलं लक्ष

Independence Day Patriotic posts of Indian Cricketers : आज देशभरात 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही आपापल्या शैलीत हा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत. या खास प्रसंगी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत देशवासीयांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गौतम गंभीर यांची खास पोस्ट व्हायरल –
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर आपल्या टीम इंडियाच्या जर्सीतील एक फोटो शेअर केला. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “माझा देश, माझी ओळख, माझे जीवन.” ही पोस्ट चाहत्यांमध्ये आणि देशवासीयांमध्ये जोश निर्माण करत आहे. गंभीर यांनी अनेक वर्षे भारतीय संघासाठी क्रिकेट खेळले असून, 2011 च्या विश्वचषक फायनलमधील त्यांच्या शानदार खेळीने भारताला विश्वविजेता बनवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
My country, my identity, my life! Jai Hind!🇮🇳#IndependenceDay pic.twitter.com/seiUpwc8so
— Gautam Gambhir (@GautamGambhir) August 15, 2025
विराट कोहलीने शेअर केला भावनिक संदेश –
Virat Kohli’s Instagram story on India’s independence day. 🇮🇳 pic.twitter.com/GqOUkuBJWF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 15, 2025
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये तो म्हणाला, “आज आम्ही स्वातंत्र्यात हसतोय, कारण त्यांनी अटल धैर्याने देशाचे रक्षण केले. या आनंदमयी स्वातंत्र्य दिनी आपण आपल्या नायकांच्या बलिदानाला सलाम आणि सन्मान करतो. भारतीय असल्याचा अभिमान आहे. जय हिंद.” कोहलीचा हा संदेश चाहत्यांच्या हृदयाला भिडला आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला. त्यांच्या या संदेशात देशभक्ती आणि कृतज्ञतेची भावना दिसून आली, ज्याचे लाखो लोकांनी कौतुक केले.
सचिन तेंडुलकरने दिल्या शुभेच्छा –
Happy Independence Day!
Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/W8K8iMPD8d— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 15, 2025
स्वातंत्र्य दिनानिमित्त महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी तिरंग्यासोबतचा आपला एक फोटो शेअर केला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद…” या पोस्टलाही चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली. रतीय क्रिकेटपटूंच्या या पोस्ट्समुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणखी वाढला असून, देशवासीयांमध्ये देशभक्तीचा जोश संचारला आहे.





