IND vs AUS 3rd Test : गाबा कसोटीसाठी ऑस्ट्रेलियानं केली प्लेइंग XI ची घोषणा, ॲडलेडमध्ये 5 विकेट घेणारा गोलंदाज संघाबाहेर…

IND vs AUS Gabba Test (Australia playing 11) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना शनिवार (14 डिसेंबर)पासून ब्रिस्बेन येथील गाबामध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. पाच सामन्यांची ही कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ॲडलेडमध्ये पाच विकेट घेणाऱ्या स्कॉट बोलँडला संघातून वगळण्यात आले आहे आणि त्याच्या जागी जोश हेझलवूडचे संघात पुनरागमन झाले आहे.
स्टार वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड तिसऱ्या कसोटीसाठी संघात परतला आहे. हेजलवूड पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे ॲडलेडमध्ये पिंक बॉल कसोटी खेळू शकला नाही. त्यानंतर त्याच्या जागी स्कॉट बोलंडला संधी मिळाली, ज्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात एकूण पाच विकेट घेतल्या.
JUST IN: Josh Hazlewood is back for the Gabba Test! #AUSvIND pic.twitter.com/ikV3L6JAU6
— cricket.com.au (@cricketcomau) December 13, 2024
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल शक्य…
गाबा येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाने अद्याप आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केलेली नाही, मात्र टीम इंडिया काही बदलांसह तिसऱ्या कसोटीत उतरू शकते, असे मानले जात आहे. भारतीय संघ कोणत्याही फिरकीपटूशिवाय या सामन्यात प्रवेश करू शकतो तर कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.
गाबाची पिच रिपोर्ट…
ब्रिस्बेनच्या गाबाची खेळपट्टी तयार करणारे क्युरेटर डेव्हिड सँडुर्स्की यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “वेगवान गोलंदाजीनुसार खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, जसजसा सामना पुढे जाईल तसतशी खेळपट्टीमध्ये तडे (cracks) दिसू लागतील. गाबाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी नेहमीच अनुकूल राहिली आहे. खेळपट्टीवर भरपूर उसळी (bounce) पाहायला मिळते.”
IND vs AUS 3rd Test : गाबाची पुनरावृत्ती होणार नाही – मिचेल मार्श
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन – उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेझलवूड.





