IND vs AUS 4th Test : मेलबर्नमध्ये भारतासाठी कोणी केल्या आहेत सर्वाधिक कसोटी धावा, जाणून घ्या आकडेवारी…

IND vs AUS (most test runs for India in Melbourne) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवली जाणार आहे. 26 डिसेंबरपासून दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. सध्या 5 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बॉक्सिंग डे कसोटी जिंकून दोन्ही संघांचा मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल.
पण मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतासाठी आतापर्यंत कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? या यादीत कोणत्या फलंदाजाचे नाव आहे? या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कोहलीची चमकदार कामगिरी…
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर विराट कोहलीने 6 डावात 52.66 च्या सरासरीने 316 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 शतकाव्यतिरिक्त त्याने दोनदा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 28 सामन्यात 2 हजार 168 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 9 शतकांचा समावेश आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत विराट कोहलीने शतक झळकावले होते, मात्र त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीची बॅट शांत राहिली आहे.
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द…
विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने 121 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये या फलंदाजाने 47.49 च्या सरासरीने 9 हजार 166 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने कसोटी फॉरमॅटमध्ये 30 शतके झळकावली आहेत. याशिवाय पन्नास धावांचा आकडा 31 वेळा पार केला आहे. तसेच विराट कोहलीच्या नावावर कसोटी फॉरमॅटमध्ये 7 द्विशतके आहेत.
मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत विराट कोहली कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये विराट कोहलीची बॅट चालली तर भारतीय संघाच्या अडचणी कमी होऊ शकतात.
तसे मेलबर्नमध्ये सर्वाधिक धावा करण्यात सचिन आघाडीवर…
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिनने 1991 ते 2011 पर्यंत मेलबर्न क्रिकेट मैदानावर 5 कसोटी सामने (10 डाव) खेळले आहेत. या 10 डावांमध्ये त्याने 44.90 च्या सरासरीने 449 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यानंतर अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीचा क्रमांक लागतो.
सचिन तेंडुलकर (1991-2011) : 5 सामने (10 डाव), 449 धावा (1 शतक/3 अर्धशतक)
अजिंक्य रहाणे (2014-2010) : 3 सामने (6 डाव), 369 धावा (2 शतक/0 अर्धशतक)
विराट कोहली (2011-2018) : 3 सामने (6 डाव), 316 धावा (1 शतक/2 अर्धशतक)
विरेंद्र सेहवाग (2003-2011) : 2 सामने (4 डाव), 280 धावा (1 शतक/1अर्धशतक)





