IND vs AUS 3rd Test : चौथ्या दिवसाचा खेळ संपला, आकाशदीप- बुमराहने फॉलोऑन टाळला, गाबा टेस्ट ‘ड्रॉ’च्या दिशेने…

IND vs AUS 3rd Test Day 4 Stumps : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 445 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा पहिला डाव सुरू आहे.
दरम्यान कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने पहिल्या डावात नऊ गडी गमावून 252 धावा केल्या आहेत. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांच्या धाडसी फलंदाजीमुळे भारताने फॉलोऑन वाचवला आहे. दोघेही नाबाद आहेत. याशिवाय तत्पूर्वी रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांनीही शानदार फलंदाजी करत अर्धशतके झळकावली.
आकाशदीप 27 धावांवर तर बुमराह 10 धावांवर नाबाद आहे. आतापर्यंत दोघांमध्ये 10व्या विकेटसाठी 54 चेंडूत 39 धावांची भागीदारी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. त्यानुसार टीम इंडिया अजूनही 193 धावांनी मागे आहे. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला 246 धावसंख्येपर्यत मजल मारणे गरजेचे होते.
Stumps on Day 4 in Brisbane!
A fighting day with the bat 👏👏#TeamIndia move to 252/9, trail by 193 runs
A gripping Day 5 of Test cricket awaits tomorrow
Scorecard – https://t.co/dcdiT9NAoa#AUSvIND pic.twitter.com/QxCJkN3RR8
— BCCI (@BCCI) December 17, 2024
जसा आकाशने चौकार मारून फॉलोऑन वाचवला. ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित रोहित शर्मा, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी उत्साहात खुर्चीवरून उडी मारली. तिघांनीही एकमेकांना टाळ्या दिल्या.
👏Hits a boundary to avoid the follow-on
🙌Smashes a six into the stands soon afterAkash Deep!
(via @cricketcomau) #AUSvIND pic.twitter.com/HcTOK83XJr
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 17, 2024
आकाश आणि बुमराह जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये परतत होते तेव्हा तिघांसह चाहत्यांनी सुध्दा त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिले. आता एक दिवसाचा खेळ बाकी आहे आणि हा कसोटी सामना ड्रा होण्याच्या दिशेने जात आहे.
आज काय घडलं…?
भारताने कालच्या चार बाद 51 धावांवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, लवकरच संघाला रोहित शर्माच्या रूपाने पाचवा धक्का बसला. रोहित 10 धावा करून कमिन्सचा बळी ठरला. यानंतर राहुलने जडेजासोबत 67 धावांची भागीदारी केली. राहुलचे शतक हुकले आणि तो 139 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 84 धावा करून बाद झाला.
यानंतर नितीश रेड्डी आणि रवींद्र जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. नितीश 16 धावा करून कमिन्सच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्याचवेळी सिराजही एक धाव करत माघारी परतला. त्याचवेळी दुसऱ्या टोकाला उपस्थित असलेल्या जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 22वे अर्धशतक झळकावले. तो नवव्या विकेटच्या स्वपरूपात बाद झाला. त्याला कमिन्सने मार्शच्या हाती झेलबाद केले. जडेजाने 123 चेंडूंत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 77 धावांची खेळी केली.
यानंतर बुमराह आणि आकाशने धाडस दाखवत भारताला फॉलोऑन पासून वाचवले. दोघेही आता पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाची आघाडी आणखी कमी करण्याचा प्रयत्न करतील. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार कमिन्सने आतापर्यंत चार विकेट घेतल्या आहेत. तर मिचेल स्टार्कने तीन विकेट घेतल्या. जोश हेझलवूड आणि नॅथन लायनला प्रत्येकी एक विकेट मिळाली. याआधी सोमवारी यशस्वी चार धावा केल्यानंतर, गिल एक धावा करून, विराट तीन धावा करून आणि पंत नऊ धावा करून बाद झाला.





