IND vs AUS 2nd Test : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत 295 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने परंपरेचे पालन करत ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटीसाठी एक दिवसआधी म्हणजेच गुरुवारी (5 डिसेंबर) प्लेइंग 11 ची घोषणा केली. गुलाबी चेंडू कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग 11 मध्ये एक बदल झाला.
ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या डे-नाईट टेस्ट कसोटीसाठी (Pink Ball Test) ऑस्ट्रेलियानं प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. दुखापतग्रस्त जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलँड खेळताना दिसणार आहे. अशी माहिती कर्णधार पॅट कमिन्स याने दिली आहे. हा काही आश्चर्यकारक निर्णय नव्हता. हेझलवूड दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यानंतर हे घडणे निश्चित होते. स्कॉट बोलँड जवळपास 18 महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियासाठी पहिला सामना खेळताना दिसणार आहे. बोलँडने गेल्या वर्षी ॲशेस मालिकेत शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
JUST IN: Skipper Pat Cummins confirms one change for Australia for the second Test #AUSvIND
Details: https://t.co/Q0VdwRyLQs pic.twitter.com/IklVy2a5Zc
— cricket.com.au (@cricketcomau) December 5, 2024
कमिन्स याने पुढे सांगितले की, मिचेल मार्श दुसऱ्या कसोटीत गोलंदाजी करताना दिसणार आहे. हा अष्टपैलू खेळाडू गेल्या काही दिवसापासून पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त आहे. त्यामुळे भारताच्या दुसऱ्या डावात त्याला पूर्ण गतीने गोलंदाजी देखील करता आली नव्हती.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी क्रमवारीतही कोणताही बदल झालेला नाही याचा अर्थ नॅथन मॅकस्विनी उस्मान ख्वाजासोबत ओपनिंग करताना दिसणार आहे. स्टीव्ह स्मिथची दुखापत गंभीर नसून तो देखील खेळणार आहे. स्मिथला अलीकडेच सराव सत्रादरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती.
बोलँडची आतापर्यंतची कामगिरी….
ऑस्ट्रेलियाने स्कॉट बोलँडला संधी दिली आहे कारण हेजलवूड दुखापतग्रस्त आहे. त्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. बोलँडने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत 35 विकेट्स घेतल्या आहेत. एका डावात 7 धावा देत 6 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याने 107 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 384 विकेट घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 पुढीलप्रमाणे – उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
Test Cricket | ऋषभने धोनीची पोकळी भरून काढली, राहुल द्रविडनं केलं कौतुक…
रोहित सलामीला येणार का…?
दरम्यान, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली होती. संघानं ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला होता. यानंतर भारताने सराव सामना देखील 6 गडी राखून जिंकला होता. आता ॲडलेडमध्ये दुसऱ्या कसोटीची तयारी सुरू आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “तो ओपनिंग करणार नाही. रोहित मधल्या फळीत फलंदाजी करेल. तर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीसाठी मैदानात उतरतील. अशा परिस्थितीत शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.