Ind vs Aus 2nd Test : टीम इंडियाला ॲडलेडचा किल्ला भेदता आलेला नाही. पिंक बॉल कसोटी ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून जिंकली आहे. यासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. याआधी पर्थ कसोटीत भारताने 295 धावांनी मोठा विजय नोंदवला होता.
Australia win the second Test and level the series.#TeamIndia aim to bounce back in the third Test.
Scoreboard ▶️ https://t.co/upjirQCmiV#AUSvIND pic.twitter.com/Tc8IYLwpan
— BCCI (@BCCI) December 8, 2024
ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंत कधीही पराभव झालेला नाही. त्यांचा हा सलग आठवा विजय आहे.मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवला जाणार आहे.ट्रॅव्हिस हेड हा सामनावीर ठरला.
या कसोटीत टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 180 धावा करता आल्या. यानंतर ट्रॅव्हिस हेडच्या 140 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या आणि 157 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ केवळ 175 धावा करू शकला आणि ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचे लक्ष्य दिले, जे कांगारूंनी एकही विकेट न गमावता पूर्ण केले. यादरम्यान उस्मान ख्वाजा नऊ धावांवर तर मॅकस्विनी 10 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने पहिल्या डावात 6, तर पॅट कमिन्सने दुसऱ्या डावात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
फलंदाजीत भारताचा फ्लॉप शो…
ॲडलेड कसोटीत भारताची फलंदाजी सुरुवातीपासूनच असहाय्य दिसत होती. टीम इंडियासाठी नितीश रेड्डीने दोन्ही डावात अनुक्रमे सर्वाधिक 41 आणि 41 धावांची खेळी केली. विराट कोहलीला दोन्ही डावात (7+11) एकूण 18 धावा करता आल्या तर कर्णधार रोहित शर्माला संपूर्ण सामन्यात (3+6) केवळ 9 धावा करता आल्या. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा फ्लाॅप ठरला. त्याला पहिल्या डावात खातंही खोलता आलं नाही तर दुसऱ्या डावात त्याला फक्त 24 धावा करता आल्या.
IND vs AUS 2nd Test : ….त्यामुळेच विराट कोहलीची सरासरी घसरली – संजय मांजरेकर
स्टार्क-कमिन्सचा कहर…
स्टार्कने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 2 अशा संपूर्ण सामन्यात एकूण 8 विकेट घेतल्या. कमिन्सने पहिल्या डावात 2 बळी घेतले होते मात्र, दुसऱ्या डावात त्यानं जबाबदारी स्वीकारली आणि दुसऱ्या डावात त्याने 5 बळी घेतले. तर दोघांना स्कॉट बोलँडनं चांगली साथ दिली. त्यानं पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या.