ॲडलेड – भारताचा अव्वल फलंदाज असलेला विराट कोहली बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या दुसऱ्या लढतीत देखील स्वस्तात परतला. गेल्या वर्षभरापासून विराट कोहली धावांसाठी झगडत आहे. सातत्याने ऑफ स्टंप्सच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर तो बाद होत आहे. मात्र तो जोपर्यंत ऑफ-स्टंपबाहेरील कमजोरी दूर करत नाही त्याच्या फलंदाजीची सरासरी घटतच राहणार असल्याचे माजी क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर म्हणाले.
पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहलीने शतकी खेळी करताना पुन्हा लय प्राप्त केली होती. मात्र तो दुसऱ्या कसोटीत देखील ७ धावांवर असताना मिचेल स्टार्कच्या ऑफ स्टम्पबाहेर जाणाऱ्या उसळत्या चेंडूवर स्मिथकडे झेल देवून परतला.
One important reason why Virat’s average has slipped to 48 now, is the unfortunate weakness outside off. But more crucially his adamance to not try another way to tackle it.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) December 6, 2024
कोहली बाद झाल्यानंतर मांजरेकर यांनी ट्विटरवर लिहिले, “विराटची सरासरी आता ४८ च्या आसपास पोहोचण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्याची ऑफ-स्टंपबाहेरची कमजोरी. इतकेच काय यातून बाहेर पाडण्यासाठी तो इतर कोणताही उपाय न करण्यावर ठाम असल्याचे मांजरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
U19 Asia Cup 2024 | पाकिस्तानचे भंगले स्वप्न, भारत आणि बांगलादेशमध्ये रंगणार विजेतेपदाची लढत…
काही वर्षांपूर्वीपर्यंत, कोहलीची कसोटीत सरासरी ५४-५५ च्या आसपास होती. दीर्घकाळ मोठी खेळी न खेळल्यामुळे त्याची सरासरी २०२२ मध्ये ५० च्या खाली गेली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या घरच्या मालिकेत १५.५० च्या सरासरीने केवळ ९३ धावा केल्या होत्या.