IND vs AUS 1st Test : शतकी खेळीसह ‘यशस्वी जैस्वाल’ने रचला इतिहास, ‘या’बाबतीत साधली सचिनशी बरोबरी…

IND vs AUS 1st Test (Yashasvi Jaiswal) : पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात यशस्वी जैस्वालने शतक झळकावले. या शतकासह जैस्वालने भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. जैस्वालने अवघड खेळपट्टीवर 205 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर तो 297 चेंडूत 15 चौकार अन् 3 षटकाराच्या मदतीने 161 धावा करत बाद झाला.
1⃣6⃣1⃣ Runs
2⃣9⃣7⃣ Balls
1⃣5⃣ Fours
3⃣ Sixes𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗞𝗡𝗢𝗖𝗞! 🙌 🙌
Well played, Yashasvi Jaiswal 👏 👏
Live ▶️ https://t.co/gTqS3UPruo#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/WfSbWkWDoI
— BCCI (@BCCI) November 24, 2024
2024 च्या कॅलेंडर वर्षातील यशस्वीचे हे तिसरे कसोटी शतक होते. सध्या जयस्वाल याचे वय 22 वर्षे 332 दिवस आहे. तर दिग्गज तेंडुलकरने 1992 च्या कॅलेंडर वर्षात वयाच्या 23 वर्षापूर्वी 3 शतके झळकावली होती. अशा प्रकारे जैस्वालने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. या यादीत सुनील गावस्कर आणि विनोद कांबळी संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. गावस्कर यांनी 1971 च्या कॅलेंडर वर्षात 4 शतके झळकावली होती. याशिवाय 1993 च्या कॅलेंडर वर्षात विनोद कांबळीने 4 शतके झळकावली होती.
वयाच्या 23 वर्षापूर्वी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी शतके (भारत)
4 शतके – सुनील गावस्कर (साल 1971)
4 शतके – विनोद कांबळी (साल 1993)
3 शतके – रवी शास्त्री (साल 1984)
3 शतके – सचिन तेंडुलकर (साल 1992)
3 शतके – यशस्वी जैस्वाल (साल 2024)
यासह जैस्वाल ऑस्ट्रेलियात पदार्पणात शतक झळकावणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. 1967-68 मध्ये ब्रिस्बेनमध्ये शतक झळकावणाऱ्या मोटागनहल्ली जयसिम्हाने पहिल्यांदा हा पराक्रम केला होता. त्यानंतर 1977-78 मध्ये सुनील गावस्कर अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय फलंदाज ठरले होते. गावसकर यांनी ब्रिस्बेनमध्येच शतक झळकावले होते. आता जैस्वालने पर्थमध्ये खेळताना ही आश्चर्यकारक कामगिरी केली.
वयाच्या 23 व्या वर्षापूर्वी भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतके
जयस्वाल वयाच्या 23 वर्षांच्या आधी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील झाला. जयस्वालचे हे चौथे शतक होते. या यादीत सचिन तेंडुलकर 8 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.
8 – सचिन तेंडुलकर
5– रवी शास्त्री
4 – सुनील गावस्कर
4 – विनोद कांबळी
4 – यशस्वी जैस्वाल





