INDvsAUS 1st Test। अश्विनच्या 450 विकेट्सने रचला खास विक्रम; अनिल कुंबळेलाही टाकले मागे

IND vs AUS 1st Test – टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून (९ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवशीचा खेळ पाहता टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने सामन्याच्या पहिल्या दिवशी एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४५० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४५० बळींचा टप्पा गाठणारा अश्विन हा दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याने ८९व्या कसोटीत ही कामगिरी केली आहे. या यादीत प्रथम क्रमांकावर श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन असून त्याने ८० सामन्यांमध्ये ४५० बळी घेण्याची कारागिरी केलेली आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीला बाद करून अश्विनने ४५० बळींचा टप्पा गाठला. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात १५ षटके गोलंदाजी केली आणि पाहुण्या संघाच्या ३ गड्यांना तंबूत पाठवले.
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ४५० बळींचा आकडा गाठणारा अश्विन हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी भारतासाठी अनिल कुंबळेने अशी कामगिरी केलेली आहे. कुंबळेच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ६१९ बळी आहेत. भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने ९३व्या कसोटी सामन्यात ८ मार्च २००५ला मोहालीतील पाकिस्तानविरुद्ध ४५० बळींचा टप्पा गाठला होता. त्यामुळे अशी कामगिरी करण्याच्या बाबतीत आता अश्विनने कुंबळेला मागे टाकले आहे.
🚨 Milestone Alert 🚨
4⃣5⃣0⃣ Test wickets & going strong 🙌 🙌Congratulations to @ashwinravi99 as he becomes only the second #TeamIndia cricketer after Anil Kumble to scalp 4⃣5⃣0⃣ or more Test wickets 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS pic.twitter.com/vwXa5Mil9W
— BCCI (@BCCI) February 9, 2023
पाहुण्या संघाची फलंदाजी ढेपाळली
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी सलामीच्या डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या जोडीला तंबूची वाट दाखवली. त्यानंतर भारतीय गोलंदाजीचा मोर्चा आर.आश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी सांभाळला. या दोन्ही फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज पूर्णपणे दबावात खेळताना दिसले. सामन्याच्या पहिल्या डावात जडेजाने २२ षटके गोलंदाजी केली आणि सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर आश्विनने १५ षटके गोलंदाजी केली आणि पाहुण्या संघाच्या ३ गड्यांना तंबूत पाठवले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात अवघ्या १७७ धावांत सर्वबाद झाला. भारताने प्रत्युत्तरात केएल राहुलची विकेट गमावली असून ७७ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत ६९ चेंडूत ५६ धावा फाटकावल्या असून तो नाबाद खेळत आहे.
Stumps on Day 1️⃣ of the first #INDvAUS Test!#TeamIndia finish the day with 77/1, trailing by 100 runs after dismissing Australia for 177 👌🏻
We will see you tomorrow for Day 2 action!
Scorecard – https://t.co/edMqDi4dkU #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/yTEuMvzDng
— BCCI (@BCCI) February 9, 2023





