India vs Australia1st ODI Match Result :- भारतीय महिला क्रिकेट संघाचा गुरुवारी (5 डिसेंबर) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने 5 गडी राखून पराभव केला. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
ॲलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान प्रिया पुनिया आणि स्मृती मंधाना सलामीसाठी आल्या होत्या. मंधाना अवघ्या 8 धावा करून तर प्रिया 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर भारताच्या नियमित अंतरावर विकेट पडत राहिल्या आणि अवघ्या 100 धावांवर भारतीय संघ गडगडला. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 23 धावा केल्या, याशिवाय हरलीन देओलने 19, हरमनप्रीत कौरने 17 आणि ऋचा घोषने 14 धावा केल्या. भारताने शेवटच्या 5 विकेट केवळ 11 धावांत गमावल्या.
ऑस्ट्रेलियासाठी मेगन स्कटने घातक गोलंदाजी केली. तिने 6.2 षटकात केवळ 19 धावा दिल्या आणि 5 बळी घेतले. याव्यतिरिक्त किम गर्थने 8 षटकात 20 धावा देत 1 बळी घेतला तर गार्डनर, सदरलँड आणि एलाना किंग यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
Australia win the first #AUSvIND ODI.#TeamIndia will be aiming to bounce back in the second ODI of the series.
Scorecard ▶️ https://t.co/RGxrsRZRGN pic.twitter.com/mC4ZBWJKnl
— BCCI Women (@BCCIWomen) December 5, 2024
ऑस्ट्रेलियासाठीही हा विजय सोपा नव्हता. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 16.2 षटकात 5 विकेट गमावल्या आणि 102 धावा करत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत जॉर्जिया वॉलने 42 चेंडूत 6 चौकार अन् 1 षटकारासह नाबाद 46 तर फोबी लिचफिल्डने 29 चेंडूत 8 चौकारासह 35 धावा केल्या. याशिवाय ॲलिसा पेरी आणि बेथ मूनीने प्रत्येकी1, ॲनाबेल सदरलँडने 6 आणि ऍशले गार्डनरने 8 धावा केल्या. ताहलिया मॅकग्रा 4 धावा करून नाबाद राहिली.
Test Cricket | ऋषभने धोनीची पोकळी भरून काढली, राहुल द्रविडनं केलं कौतुक…
भारताकडून रेणुका सिंगने चांगली गोलंदाजी केली. तिने 7 षटकात 45 धावा देत 3 बळी घेतले. प्रिया मिश्रानेही शानदार गोलंदाजी केली. तिने 2 षटकात 11 धावा देत 2 बळी घेतले.