IND vs AFG : आधी विराट अन् आता ‘या’ दोघांच्या खेळण्यावरही सस्पेन्स! अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढले
IND vs AFG : विराटपाठोपाठ आता दोन स्टार खेळाडूंच्या खेळण्याबाबत सस्पेन्स वाढला आहे, ज्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे.

IND vs AFG Rohit Sharma Hardik Pandya Fitness : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. स्टार फलंदाज विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय (वनडे) मालिकेतून आधीच बाहेर पडला आहे. आता त्यातच कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्या खेळण्यावरही मोठी टांगती तलवार निर्माण झाली आहे. बीसीसीआयने या दोघांबाबत आधीच एक कडक अट घालून ठेवली आहे. त्यामुळे ऐन मालिकेच्या तोंडावर भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे.
फायनलमधील ‘ती’ गंभीर दुखापत विराटला पडली महागात! (IND vs AFG)
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना ६ जूनपासून, तर वनडे मालिका १३ जूनपासून सुरू होत आहे. आयपीएल २०२६ च्या फायनलमध्ये फलंदाजी करताना विराट कोहलीला पळताना त्रास होत असल्याचे सर्वांनी पाहिले होते. तरीही त्याने दुखापतीवर मात करत आरसीबीला चॅम्पियन बनवले. मात्र, ही दुखापत इतकी गंभीर असेल आणि विराट संपूर्ण मालिकेतूनच बाहेर पडेल, असा अंदाज कोणालाही नव्हता. यामुळे चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.
🚨 HARDIK PANDYA COULD MISS AFGHANISTAN ODI SERIES 🚨
-Pandya is currently doubtful for the upcoming ODI series vs Afg due to fitness concerns.
– The all-rounder has been asked to undergo fitness tests and clearance at BCCI CoE before getting final approval.
[ EXPRESS SPORTS ] pic.twitter.com/n4pwme10py
— The Free Hit (@THEFREEHITHQ) June 4, 2026
रोहित-हार्दिक बाबत बीसीसीआयची ‘ही’ मोठी अट! (IND vs AFG)
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
Rohit Sharma is yet to report to the BCCI’s Centre of Excellence (CoE) for a fitness assessment and clearance, leaving his availability for the upcoming ODI series against Afghanistan in doubt! 🇮🇳🏏🙆♂️
(Source: Sahil Malhotra/ The Times of India)#India… pic.twitter.com/AoHyHqPguY
— Sportskeeda (@Sportskeeda) June 4, 2026
विराटपाठोपाठ आता रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या खेळण्याबाबत सस्पेन्स वाढला आहे. बीसीसीआयने जेव्हा अफगाणिस्तान वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला, तेव्हा या दोन्ही खेळाडूंच्या नावापुढे ‘स्टार’ लावला होता. याचा अर्थ असा की, हे दोघेही ‘फिटनेस क्लिअरन्सच्या अटीवर’ संघात असतील. जर हे खेळाडू पूर्णपणे फिट ठरले, तरच त्यांना मैदानात उतरता येईल. रोहित शर्माच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र, हार्दिक पांड्या बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मध्ये पोहोचला असून तिथे तो आपली फिटनेस चाचणी पूर्ण करण्यासाठी कसून तयारी करत आहे. (IND vs AFG)
मालिकेचा संपूर्ण उत्साह मातीमोल? (IND vs AFG)
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी (टेस्ट) आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे दोन्ही दिग्गज खेळाडू आता केवळ वन-डे क्रिकेटच खेळतात. अशा परिस्थितीत विराट कोहली आधीच बाहेर झाला आहे आणि रोहितच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे. जर रोहितही या मालिकेला मुकला, तर या मालिकेचा संपूर्ण उत्साह आणि हायपे पूर्णपणे संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





