IND vs AFG 1st T20I : श्रेयसऐवजी अफगाण कर्णधाराने का उडवलं नाणं? भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं
IND vs AFG 1st T20I : . टीम इंडिया स्वतःच्या देशात आणि घरच्या चाहत्यांसमोर खेळत असूनही मैदानात पाहुणा संघ म्हणून का मैदानात उतरली आहे.

IND vs AFG 1st T20I Delhi Team India Playing As Visiting Team 94 Years History : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात भारतीय क्रिकेटच्या ९४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. टीम इंडिया स्वतःच्या देशात आणि घरच्या चाहत्यांसमोर खेळत असूनही मैदानात ‘यजमान’ (Home Team) नव्हे, तर अधिकृतपणे ‘पाहुणा संघ’ (Visiting Team) म्हणून उतरली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे हे होम सामने भारतात होत असल्याने तेच या मालिकेचे अधिकृत यजमान आहेत.
श्रेयसऐवजी झादरानने का उडवले नाणे? टॉस आणि ड्रेसिंग रूमचा नियम बदलला!
क्रिकेटच्या नियमानुसार द्विपक्षीय मालिकेत यजमान संघाचा कर्णधार नाणे हवेत उडवतो, तर पाहुण्या संघाचा कर्णधार कौल (Head/Tail) मागतो. अफगाणिस्तान अधिकृत यजमान असल्याने कर्णधार इब्राहिम झादरानने नाणेफेक केली आणि भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर मैदानावर ड्रेसिंग रूमचीही अदलाबदल झाली. अरुण जेटली स्टेडियममधील मुख्य ‘होम ड्रेसिंग रूम’ अफगाणिस्तानला देण्यात आले, तर भारतीय संघाला पाहुण्या संघाच्या (विझिटिंग) ड्रेसिंग रूमचा वापर करावा लागत आहे.
‘परिस्थिती ओळखून घेतला निर्णय’; नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार श्रेयसचे वक्तव्य!
🚨 Toss 🚨#TeamIndia won the toss & opted to bowl first in the 1️⃣st #AFGvIND T20I.
Updates ▶️ https://t.co/Wacwj3tM4l pic.twitter.com/awVpzCDoZa
— BCCI (@BCCI) September 13, 2026
नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, “आम्ही आधी गोलंदाजी करू. दिल्लीत खेळताना येथील खेळपट्टीच्या स्वरूपाचा चांगला अंदाज असतो. झिम्बाब्वे दौऱ्यातील सकारात्मक ऊर्जा आणि लढाऊ वृत्ती कायम राखण्याचा आमचा प्रयत्न असेल.” या सामन्यातून जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी आणि वरुण चक्रवर्ती यांचे पुनरागमन झाले असून, सलामीला संजू सॅमसनला संधी दिल्याने युवा वैभव सूर्यवंशीला बाहेर बसावे लागले आहे.
मैदानात भारतीय गोलंदाजांचा धुव्वा; पॉवरप्लेमध्येच अफगाणिस्तान अडचणीत!
Let the Friendship Cup begin in New Delhi 🇮🇳🇦🇫
📸 Special scenes ahead of the toss as a commemorative memento is unveiled and #TeamIndia Captain @ShreyasIyer15 presents a signed jersey to Afghanistan skipper Ibrahim Zadran to commence the #AFGvIND series 🤝 pic.twitter.com/sctNcPIM5t
— BCCI (@BCCI) September 13, 2026
नाणेफेकीचा वेगळा नियम असला तरी मैदानात मात्र भारतीय गोलंदाजांनी यजमान अफगाणिस्तानवर पूर्णपणे पकड मिळवली. सामन्याच्या सुरुवातीलाच अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा करत अवघ्या ५.४ षटकांत ४१ धावांवर अफगाणिस्तानचे ४ फलंदाज माघारी धाडले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पाहुणा संघ ठरलेल्या भारताने मैदानावर मात्र घरच्या मैदानाप्रमाणेच वर्चस्व गाजवले आहे.





