IND-U19 vs AUS-U19 2nd ODI : साहिलच्या शतकाने भारताची ऑस्ट्रेलियावर सहज मात, मालिकेत घेतली विजयी आघाडी…

IND-U19 vs AUS-U19 2nd Youth ODI : – भारताच्या साहिल पारखने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया संघाला 9 गडी राखून पराभूत करताना 19 वर्षांखालील गटाच्या तीन एकदिवसीय लढतीत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी करताना 49.3 षटकांत सर्व बाद 176 धावांपर्यंत मजल मारली. रिले किंग्सेल व अलेक्स ली यांग यांनी 36 धावांची सलामी दिली. किंग्सेल धावबाद झाल्यानंतर कर्णधार ऑलिव्हर पीक (15), झॅक कार्टन (17), अलेक्स ली यांग (19) हे झटपट बाद झाले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 4 बाद 71 झाली होती. त्यानंतर एडिसन शेरीफ व ख्रिश्चन होवे यांनी 61 धावांची भागीदारी केली. मात्र ख्रिश्चन होवे बाद झाल्यानंतर लगेचच एडिसन शेरीफ देखील परतला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. किरण चोरमारे, समर्थ नागराज व मोहम्मद एनान यांनी प्रत्येकी 2 तर युध्दजीत गुहा व हार्दिक राज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
🚨2024 Australia U19 Tour of India🚨
🏆Second One Day Match Summary – India U19 (177/1) beat Australia U19 (176) by 9 wickets
🔥Sahil Parakh – 109*(75)
🏏Abhigyan Kundu – 53*(50)
🏏Kiran Chromale – 2/29 (10)
🏏Mohd Enaan – 2/30 (10)#BCCI #Cricket pic.twitter.com/zlayHaFFOA— Indian Domestic Cricket Forum – IDCF (@IDCForum) September 23, 2024
भारताने सलामीवीर साहिल पारखच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर केवळ 22 षटकांत 1 बाद 177 धावा करताना विजय साकारायला. साहिलने केवळ 75 चेंडूत 14 चौकार व 5 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 109 धावांची खेळी केली. त्याला अभिज्ञान कुंडू नाबाद 53 धावा करताना सुरेख साथ डीईली. अभिज्ञानने 50 चेंडूत 9 चौकारांच्या साहाय्याने ही खेळी सजविली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १५३ धावांची भागीदारी करताना भारताला विजय मिळवून दिला. या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
IND-U19 vs AUS-U19 1st Youth ODI : कार्तिकेय-मोहम्मदची अर्धशतके; भारताची ऑस्ट्रेलियावर सहज मात…
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया : 49.3 षटकांत सर्व बाद 176 : एडिसन शेरीफ 39 (2 चौकार), ख्रिश्चन होवे 28 (2 चौकार), अलेक्स ली यांग 19 (3 चौकार), झॅक कार्टन 17, किरण चोरमारे 10-1-29-2, समर्थ नागराज 10-0-34-2, मोहम्मद एनान10-0-30-2.
भारत : 22 षटकांत 1 बाद 177 : साहिल पारख नाबाद 109 (75 चेंडू, 14 चौकार, 5षटकार), अभिज्ञान कुंडू नाबाद 53 (50 चेंडू, 9 चौकार), रुद्र पटेल 10 (2 चौकार), हॅरी होएक्स्ट्रा 3-0-25-1.



