IND-U19 vs AUS-U19 1st Youth ODI : कार्तिकेय-मोहम्मदची अर्धशतके; भारताची ऑस्ट्रेलियावर सहज मात…

IND-U19 vs AUS-U19 1st Youth ODI – के. पी कार्तिकेय व मोहम्मद अमान यांनी केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ७ गडी राखून पराभूत करताना १९ वर्षांखालील गटाच्या तीन एकदिवसीय सामान्यांच्या लढतीत १-० अशी आघाडी घेतली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना २३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत सर्वबाद १८४ धावा केल्या. यामध्ये स्टीव्हन होगनने ४२ धावांची खेळी केली. त्याला रिले किंग्सेलने ३६ धावा करताना सुरेख साथ दिली. थॉमस ब्राऊनने २९ धावा केल्याने ऑस्ट्रेलिया संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. भारताच्या मोहम्मद एनानने भेदक गोलंदाजी करताना ३२ धावांच्या मोबदल्यात ४ गडी बाद केले. त्याला के पी कार्तिकेयने २ तर समर्थ नागराज, चेतन शर्मा, हार्दिक राज व किरण चोरमाले यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
🚨2024 Australia U19 Tour of India🚨
☀️First One Day Match Summary
🏆India U19 (185/3) beat Australia U19 (184) by 7 Wickets
🎖️KP Karthikeya – 85*(99) & 2/30
⚾Mohamed Ennan – 4/32 (10)
🏏Mohammad Amaan – 58*(89)#U19 #CricketTwitter pic.twitter.com/7y2PUFxURK— Indian Domestic Cricket Forum – IDCF (@IDCForum) September 21, 2024
भारताने ३६ षटकांत ३ बाद १८५ धावा करताना सहज विजय साकारला. सलामीवीर रुद्र पटेल व साहिल पारेख झटपट बाद झाल्याने भारताची सुरुवात निराशाजनक झाली. अभिज्ञान कुंडू देखील १४ धावा करून परतला. यावेळी भारताची अवस्था ३ बाद ३२ अशी झाली होती. त्यानंतर कर्णधार मोहम्मद अमान व के. पी. कार्तिकेय यांनी शानदार फलंदाजी करताना अजून पडझड होऊ दिली नाही. दोघांनी चौथ्या गड्यासाठी १५३ धावांची भागीदारी करताना संघाला विजय मिळवून दिला.
कार्तिकेयने ९९ चेंडूत ९ चौकार व २ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८५ धावांची तर कर्णधार मोहम्मद अमानने ८९ चेंडूत ५ चौकारांच्या साहाय्याने नाबाद ५८ धावांची खेळी करताना भारताला विजय मिळवून दिला. ओली पॅटरसनने २ तर एडन ओ’कॉनरने १ गडी बाद केला.
IND vs BAN 1st Test (Day 3 Stumps) : तिसऱ्या दिवशीही भारताचे वर्चस्व, विजयापासून आणखी 6 विकेट्स दूर…
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया : ४९.४ षटकांत सर्वबाद १८४ : स्टीव्हन होगन ४२ (२ चौकर), रिले किंग्सेल ३६ (७ चौकार), थॉमस ब्राऊन २९ (१ चौकार, १ षटकार), मोहम्मद एनान १०-०-३२-४, के पी कार्तिकेय ९-१-३०-२, समर्थ नागराज ६.४-०-३९-१, चेतन शर्मा ४-०-१५-१, हार्दिक राज १०-०-३१-१, किरण चोरमाले ८-०-२३-१
भारत : ३६ षटकांत ३ बाद १८५ : के पी कार्तिकेय ८५ (९ चौकार, २ षटकार), मोहम्मद अमान ५८ (५ चौकार), अभिज्ञान कुंडू १४ (३ चौकार), ओली पॅटरसन ५-०-२४-२, एडन ओ’कॉनर ७-०-४६-१.





