IND A vs AUS A : श्रेयस अय्यरचं दमदार कमबॅक! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ‘इतक्या’ चेंडूत झळकावले वादळी शतक

भारच-अ संघाची दमदार सुरुवात –
भारच-अ संघाच्या सलामीवीरांनी सामन्याला आक्रमक सुरुवात करून दिली. प्रियांश आर्याने 84 चेंडूत 101 धावांची खणखणीत खेळी केली, तर प्रभसिमरन सिंगने 53 चेंडूत 56 धावांचे योगदान दिले. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने मधल्या षटकांत आक्रमक फलंदाजी करत 83 चेंडूत 110 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
भारच-अ संघाचा धडाकेबाज फलंदाजीचा जलवा –
ऑस्ट्रेलिया-अ विरुद्ध भारत-अ च्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. अव्वल पाच फलंदाजांनी अर्धशतकं ठोकली. प्रियांश आर्याने 84 चेंडूत 101 धावा, प्रभसिमरन सिंगने 53 चेंडूत 56 धावा, श्रेयस अय्यरने 83 चेंडूत 110 धावा, रियान परागने 42 चेंडूत 67 धावांची खेळी (5 चौकार, 5 षटकार) आणि आयुष बडोनीने 27 चेंडूत 50 धावांची तडाखेबंद खेळी केली. भारत-अ संघाने 50 षटकांत 413 धावांचा डोंगर उभा केला.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत-अ संघाने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. या सामन्यातील विजयासाठी ऑस्ट्रेलिया-अ संघासमोर मोठे आव्हान आहे. नुकतीच भारताने पाकिस्तान पराभूत विक्रमी नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. विशेष आशिया कप २०२५ साठी जाहीर करण्यात आलेल्या संघात श्रेयसची निवड न झाल्याने बरीच चर्चा झाली होती. बऱ्याच माजी खेळाडूंनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.





