IND A vs AUS A : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, १६८ धावांनी उडवला कांगारूंचा धुव्वा
IND A vs AUS A : दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने आता आघाडी घेतली आहे. पहिला सामना चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात संपला.

IND A beat AUS A by 162 runs : भारत-ए संघाने ऑस्ट्रेलिया-ए विरुद्धच्या पहिल्या अनऑफिशियल कसोटी सामन्यात १६२ धावांनी एकतर्फी विजय नोंदवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातील शतकी खेळी आणि दुसऱ्या डावातील नाबाद योगदानासाठी कुमार कुशाग्रला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारतीय कर्णधार देवदत्त पडिक्कलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात कुमार कुशाग्रच्या ११३ धावा, तनुष कोटियनच्या ६९ आणि साई सुदर्शनच्या ५७ धावांच्या जोरावर भारताने ३३४ धावांचा भक्कम डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाकडून कोरीने ४ आणि टॉड मर्फीने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १७१ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून जेसन सांघाने सर्वाधिक ४६ धावा केल्या.
शम्स मुलानीचा भेदक मारा –
भारताकडून शम्स मुलानीने भेदक मारा करत ४ विकेट्स घेतल्या, तर कोटियन आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी २ विकेट्स मिळवल्या. पहिल्या डावाअखेर भारताला १६३ धावांची मोठी आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ केला. कर्णधार पडिक्कलच्या ५९, कुशाग्रच्या नाबाद ४६ आणि सुदर्शनच्या ३९ धावांमुळे भारताने १९९ धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३६३ धावांचे कठीण लक्ष्य उभे राहिले.
🚨 Some top performance of IND A against AUS A 🚨
Kumar Kushagra – 160 Runs
Sai Shudharsen – 96 Runs
Devdutt Padikkal – 62 Runs
Tanush Kotiyan – 70 Runs & 4 Wkt.
Shams Mulani – 5 Wkt.
T Despande – 5 Wkt.Superb performance 🔥 pic.twitter.com/3Vun2CNPZx
— VIKAS (@Vikas662005) September 25, 2026
कांगारूंचा संघ दुसऱ्या डावातही २०० धावांवर गारद –
या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंचा संघ दुसऱ्या डावातही २०० धावांवर गारद झाला. फर्गस ओ’नीलने सर्वाधिक ४७ आणि नेथन मॅक्सविनीने ३५ धावा केल्या. मात्र, ते संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत. भारताकडून दुसऱ्या डावात तुषार देशपांडे आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी ३-३ फलंदाज बाद करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारतीय युवा खेळाडूंची ही कामगिरी राष्ट्रीय संघासाठी दिलासादायक ठरली आहे. आगामी न्यूझीलंड दौऱ्यावर मुख्य खेळाडूंच्या दुखापतीच्या काळात ही मजबूत बेंच स्ट्रेंथ संकटमोचक ठरू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.





