IND A vs AFG A : टीम इंडियाचा धक्कादायक पराभव! अफगाणिस्तानने केला मोठा उलटफेर; डकवर्थ-लुईस नियमाने फिरवला सामना
IND A vs AFG A : भारतीय संघाला अफगाणिस्तान संघाकडून ४ धावांनी निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला आहे.

IND A vs AFG A Tri Series DLS Result Match Highlights : श्रीलंकेतील दांबुला येथे सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत अत्यंत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. भारतीय ‘अ’ संघाला अफगाणिस्तान ‘अ’ संघाकडून ४ धावांनी निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३४९ धावांचा अवाढव्य डोंगर उभारूनही भारतीय संघाला हा सामना जिंकता आला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्याचा निकाल अखेर डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धतीने लावण्यात आला, ज्यामध्ये अफगाणिस्तानचा संघ सरस ठरला.
सलामीवीरांचा धमाका; भारताचा ३४९ धावांचा डोंगर!
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत ‘अ’ संघाने निर्धारित ४९ षटकांत ९ गडी गमावून ३४९ धावांचा विशाल डोंगर उभा केला होता. भारताकडून अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने २१ चेंडूंत ४४ धावांची, तर प्रभसिमरन सिंगने ८४ धावांची तुफानी खेळी करून धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यानंतर फॉर्मात असलेल्या ऋतराज गायकवाडने ६६ आणि कर्णधार तिलक वर्माने ६६ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये सूर्यांश शेडगेने ४० धावा कुटल्या.
पावसाचा खोळंबा अन् अफगाणिस्तानसाठी ‘DLS’ वरदान!
Afghanistan A won by 4 runs (DLS Method).
India A will now shift focus towards their next fixture in the #TriNationSeries.
Scorecard ▶️ https://t.co/dMNsGrzIOD#INDAvAFGA pic.twitter.com/XDa1P3tNMg
— BCCI (@BCCI) June 11, 2026
३५० धावांच्या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान ‘अ’ संघाने अत्यंत आक्रमक आणि रणनीतिक फलंदाजी केली. हसन इस्किलने २९ चेंडूंत ३४ धावा करत संघाला वेगवान सुरुवात दिली, त्याला अर्शद खानने बाद केले. त्यानंतर अनुकूल रॉयने खालिद तनीवालला (२ धावा) बाद करून अफगाणिस्तानला दुसरा धक्का दिला. मात्र, यानंतर कर्णधार इम्रान मीर आणि बहीर शाह या जोडीने भारतीय गोलंदाजांची पळता भुई थोडी केली.
इम्रान मीरने ७० चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७५ धावा ठोकल्या, तर बहीर शाहने ५२ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद १२६ धावांची स्फोटक भागीदारी रचली. अफगाणिस्तानने २५.५ षटकांत २ बाद १७७ धावा केल्या असतानाच मुसळधार पाऊस सुरू झाला. ६.८५ च्या उत्तम रनरेटमुळे डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार अफगाणिस्तानचा संघ भारतापेक्षा ४ धावांनी पुढे होता. पाऊस न थांबल्याने अफगाणिस्तानला विजेता घोषित करण्यात आले.





