Corana Pune : देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची सख्या वाढत आहेत. राज्यात कोरोनाचा धोका वाढला असून सोमवारी एकूण ६५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे शहरात ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे सर्वाधिक रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रात आढळून आले आहेत. पुण्यातील सांडपाण्यात कोरोना विषाणूचा अंश सापडल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे, ‘एनआयव्ही’व राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) चे प्रतिनिधी, कोरोना कृतिदल सदस्य उपस्थित होते. काळजी घेण्याच्या सूचना दिल्या या बैठकीत सध्याच्या कोरोनाचा जो बदल झालेला विषाणू आहे, तो सौम्य असल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने एनआयव्हीने दिली आहे. ज्यांना सहव्याधी आहेत त्यांना काही लक्षणे दिसून येत असल्याचे देखील सांगण्यात आले. एनआयव्हीच्या प्रतिनिधींनी सध्याचा विषाणून सौम्य असल्याचे जनुकीय क्रमनिर्धानरणाद्वारे समोर आल्याचे सांगितले आहे. त्यानुसार आयुक्त नवल किशोर राम यांनी वयोवृद्ध व सहव्याधी असलेल्या रुग्णांबाबात योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात आतापर्यंत १७,२९२ कोरोना चाचण्या झाल्या असून त्यापैकी १ हजार ५०४ रुग्ण बाधित आढळले आहेत. यापैकी ८७३ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आता सोमवार ९ जूनची कोरोनाबाधितांची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये एकूण ६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात आढळून आले आहेत. सध्या पालिका हद्दीत ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यःस्थितीत राज्यात ६१३ सक्रिय रुग्ण आहेत. हेही वाचा: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात ; सेन्सेक्सची २०० अंकांची उसळी, निफ्टीने २५१०० चा टप्पा ओलांडलाहेही वाचा