परकीय चलन साठ्यात वाढ: 1.9 अब्ज डॉलरने वाढून 688 अब्ज डॉलरवर

foreign exchange reserves – परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजार खरेदी वाढत आहे. भारताचे स्थूल अर्थव्यवस्था भक्कम असल्यामुळे बर्याच परकीय कंपन्या भारतामध्ये थेट गुंतवणूक करीत आहेत. या कारणामुळे जागतिक व्यापार परिस्थिती नकारात्मक असतानाही भारताकडील परकीय चलन साठ्यात वाढ होत आहे.
25 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलनसाठा 1.9 अब्ज डॉलरने वाढून 688 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. गेल्या आठ आठवड्यापासून एकतर्फी परकीय चलन साठ्यात वाढ होत आहे. या अगोदच्या आठवड्यात परकीय चलन साठा तब्बल 8.31 अबज डॉलरने वाढला होता.
अमेरिकेत अर्धा टक्के व्याजदर कपात झाल्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये परकीय चलनसाठा वाढून 704.8 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेला होता. त्यानंतर अमेरिकेतील परिस्थिती बिघडत गेली व व्याजदर कपातीची शक्यता मंदावली. अशा परिस्थितीत परकीय चलन साठ्यात बरीच घट झाली होती.
या कालावधीत डॉलर बळकट होत असल्यामुळे रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व बँकेला बर्याच प्रमाणात डॉलरची विक्री करावी लागली. यामुळेही परकीय चलन साठ्यावर परिणाम झाला होता.
आता भारतीय रुपयात कमालीचा मजबूत झाला आहे. खनिज तेलाचे दर कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत भारताची चलन साठ्याची परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून येते. या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. अशा परिस्थितीत भारतात कडील सोन्याचे मूल्य 207 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 84.3 अब्ज डॉलर या पातळीवर गेले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे भारताची 4.5 अब्ज डॉलरची ठेव आहे.



