लखनौ – उत्तर प्रदेशातील लुलु नावाचे एक मॉल काही दिवसांपासून चर्चेत असून ते राजकीय कुरघोड्यांचे केंद्रबिंदू होऊ पाहत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यात हस्तक्षेप करत प्रशासनाला योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. असे असले तरी या मॉलवरून सोशल मीडियावर मात्र चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
योगी आदित्यनाथ यांनीच या मॉलचे उदघाटन केले होते. त्यानंतर या मॉलमध्ये सामूहिक नमाज पठण केले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर या कृतीच्या विरोधात तेथे हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. तसेच मॉलमध्ये केवळ हिंदू मुलींनाच काम दिले जात असल्याचा आरोपही झाला व उलटसुलट चर्चा सुरू झाल्यामुळे मॉल वादात सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर योगींनी स्थानिक प्रशासनाने काय ती कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
पर्यटकांना मोहित करणारा अॅम्ब्रेला फॉल वाहता झाला
दरम्यान, कारवाई व्हायची ती होईलच. मात्र या सगळ्या प्रकारामुळे सोशल मीडियावर काहींनी योगींची प्रशंसा केली आहे. जे पेरले तेच उगवले असे म्हणत एका व्यक्तीने लक्ष्य केले असताना जात आणि धर्म कोणताही असो त्याकडे न पाहता चुकीच्या बाबी रोखण्याचे जे सक्त आदेश दिले गेले आहेत त्याची प्रशंसा काही जणांनी केली आहे. संबंधित मॉल एक व्यावसायिक प्रतिष्ठान आहे व तेथे राजकीय हेतूंनी कारस्थाने केली जाऊ नयेत असे निर्देश योगींनी दिले आहेत.