‘या’ देशात लग्नाच्या रात्री वराच्या मित्रांकडून चक्क वधूचे होते अपहरण; नंतर मागतात खंडणी….

पुणे – जगातील प्रत्येक देशात आणि शहरात लग्नाच्या अनेक प्रथा पाळल्या जातात. काही परंपरा खूप विचित्र असतात तर काही प्रथा खूप खास असतात. लग्नात चपला चोरण्याचा विधी भारतात खूप लोकप्रिय आहे, अशाच प्रकारे रोममध्ये असा एक विधी पाळला जातो, ज्याबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल. वास्तविक, येथील लग्नात वधूसोबत या विचित्र प्रथा पाळल्या जातात.
इटलीची राजधानी रोममध्ये पार पडलेल्या लग्नात अनेक प्रकारच्या परंपरा पाळल्या जातात. मुला-मुलींचे कुटुंबीयही यात भाग घेतात. लग्नात अनेक प्रकारचे विचित्र खेळ खेळले जातात, जे खेळण्यात लोकांना मजा येते. इथल्या लग्नात पाळल्या जाणार्या प्रथा जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला जाणून घेऊया रोमच्या लग्नातील विचित्र प्रथेबद्दल.
रोममध्ये लग्नाच्या रात्री वधूचे अपहरण करण्याची प्रथा आहे. वराचे मित्र वधूचे अपहरण करतात आणि वधूही आनंदाने त्यांच्यासोबत जाते. यानंतर मित्रांना खंडणीची रक्कम देईपर्यंत वधूला वराकडे जाण्याची परवानगी नसते.
रोमन विवाहांमध्ये या प्रथेचे नाव ‘ब्राइड नॅपिंग’ आहे. यामध्ये वधूला वराच्या समोर उचलले जाते. अपहरण खरे दिसावे म्हणून वराचे मित्रही त्यांच्याजवळ शस्त्रे ठेवतात. लग्नात आलेले पाहुणे आणि वरांसमोर वधूचे अपहरण केले जाते. यानंतर वधूला सोडण्याऐवजी खंडणीची मागणी केली जाते. खंडणी मिळाल्यानंतरच वधूला सोडले जाते.
खंडणीत काय मागितले जाते ?
प्रथेनुसार, वराचे मित्र वधूच्या सुटकेच्या बदल्यात खंडणीची मागणी करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक दारूच्या बाटल्या खंडणी मागितल्या जातात किंवा वराला सर्वांसमोर आपले प्रेम व्यक्त करावे लागते. वधू वराच्या मित्रांसोबत नाचत निघून जाते.
मौजमजा करणे हे त्यामागचे कारण आहे. वधू अपहरणाची प्रथा जगातील अनेक देशांमध्ये पाळली जाते. काही देशांमध्ये वधूला सोडण्याऐवजी पैशांचीही मागणी केली जाते. मागणी पूर्ण होईपर्यंत वधूला कैदेत ठेवले जाते.





