भाजपाला हरविण्याची ताकद प्रादेशिक पक्षांमध्ये, काँग्रेसमध्ये नाही – असदुद्दीन ओवेसी
Updated On:

हैदराबाद – देशभरात भाजपा कुठे हरली असेल तर ती पंजाबमध्ये ज्याठिकाणी शिख आहेत. अनेक प्रादेशिक पक्षांमुळे भाजपा हरली आहे. भाजपाला काँग्रेसने हरवलं नाही अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असउद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर केली आहे.
तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमेठीसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पराभूत झाले आणि वायनाड येथून निवडून आले. कारण त्याठिकाणी 40 टक्के मुस्लिम आहेत.
तेलंगणा येथे रविवारी खासदार ओवेसी यांनी जनसभेला संबोधित केले. यावेळी ओवसी म्हणाले, वायनाडमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विजयामागे 40 टक्के मुस्लीम मतदार आहेत. आमच्या पूर्वजांनी विचार केला असेल की हा नवा भारत आहे. मला अजूनही अपेक्षा आहे की, भारतात मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळेल.




