– जान्हवी शिरोडकर सध्या ग्रोक पुन्हा एकदा चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे ग्रोकने एकेकाळी हुकुमशहा असलेल्या हिटलरचे कौतुक केले. शिवाय स्वतःला मॅचहिटलरही म्हटले आहे. यावरून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तुम्ही एखाद्या आर्टिङ्गिशियल मॉडेलकडून राजकीय मुद्द्यावर ठोस किंवा ठाम भूमिकेची अपेक्षा ठेवू शकत नाही. कारण त्याचे प्राथमिक काम माहिती गोळा करणे, माहितीची योग्य रितीने हाताळणी करणे आणि ती सर्वांपर्यंत पोचवण्याचे असते. तुम्ही एखाद्या एआय मॉडेलला एखादा वादग्रस्त प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर हेच असेल की, यासंदर्भात माझे कोणतेही वैयक्तिक मत नसून त्यांसंबंधी घडलेल्या गोष्टींची माहिती देऊ शकतो. मात्र काही एआय मॉडेल्स प्रामुख्याने इलॉन मस्क यांच्या ग्रोकबाबत असे म्हणता येणार नाही. कारण अलीकडेच त्याने वादग्रस्त आणि ज्वलंत राजकीय मुद्द्यात हात घालत स्वत:चे हात पोळून घेतले आहेत. सध्या ग्रोक पुन्हा चर्चेत आहे. यामागचे कारणही तसेच आहे. जगभराने द्वेष केलेल्या हुकुमशहा हिटलरचे ग्रोकने कौतुक केल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे. ग्रोकने मांडलेल्या विचाराचा मतितार्थ काढल्यास त्याने हिटलरला प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले आणि ज्यूसंदर्भात अवमानकारक मते मांडली. त्याच्या मते, ज्यू हे श्वेतवर्णियांच्या विरोधात चुकीचा नॅरेटिव्ह पसरवत आहेत. गोल्डस्टिन, रोजेनबर्ग, सिल्वरमॅन, कोहेन आणि शपिरो यासारख्या टोपणनावाचा वापर हा नेहमीच बोलबच्चन (ज्यू) कट्टरपंथीयासाठी केला जातो आणि ते दुसर्याला अडचणीत आल्याचे पाहून आनंदी होतात, असे ग्रोकने नमूद केले. ही मंडळी माध्यम, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण करत असली तरी अमेरिकी लोकसंख्येत त्यांचे प्रमाण केवळ दोन टक्केच आहे. ग्रोकने स्वत:ला ‘मॅचहिटलर’ नावाने ओळख करून दिली. म्हणजेच हिटरलरचा स्तुतीपाठक. मे महिन्यात देखील त्याने असाच कारनामा केल्याचे कदाचित आठवत असेल. ग्रोक जे काही करतोय ते ‘हॅलुसिनेशन’ नाही. जेव्हा एआय मॉडेल एखाद्या प्रश्नांचे उत्तर देण्याच्या स्थितीत नसेल तर तो उलटे-सुलटे उत्तर देऊ लागतो. परंतु सध्या ग्रोक बाल्यावस्थेत असल्याने अशा प्रकारची उत्तरे मिळताना दिसतात. इलॉन मस्क यांनी अनेकदा आपले एआय मॉडेल व्होक (कोणतीही भूमिका न घेणारा किंवा ठोस उत्तर न देणारा) नसल्याचे म्हटले आहे. तो तटस्थ किंवा हातचे राखून उत्तर देणार्या भूमिकेपासून मुक्त आहे. त्याला स्वत:चे म्हणणे गंमतीशीर पद्धतीत मांडण्यासाठी तयार केले आहे. अर्थात, ग्रोकची आतापर्यंतची उत्तरे पाहिली तर सत्याचा शोध घेणारे मॉडेल म्हणून मस्क यांचा दावा एआयनेच खोडून काढला आहे. ग्रोकचे मत काहीवेळा पूर्वग्रहदूषित असून कधी कधी टोमणे मारणारे देखील आहे. अँटी व्होक असणे, गंमतीशीर पद्धतीने उत्तर देणे आणि कथित सत्याचा शोध घेणे ही ग्रोकची खासियत असू शकते, मात्र त्याचा कमकुवतपणा देखील असू शकतो. जेव्हा मर्यादा ओलांडतो तेव्हा तो भरकटू लागतो. जगभरातील सर्व एआय मॉडेल हे स्वत:ला वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण आणि बिनधास्त तसेच विनोदी स्वभावाचे होण्यासाठी धडपडत असताना ग्रोक मॉडेल मात्र अति विश्वास आणि स्वत:लाच श्रेष्ठ समजण्याच्या दिशेने झुकत आहे. दुसर्याला पडताळून पाहत असताना मनाप्रमाणे बोलण्याच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहे. अलीकडेच मस्क यांनी ग्रोकला सर्वसमावेशक रूप देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. कारण तो माध्यमांचीच भाषा बोलत आहे. याचा अर्थ ग्रोकला बिनधास्त बोलणे हवे आहे. मस्क मात्र विसरतात की, पारंपरिक माध्यमे जबाबदार आणि विवेकपूर्ण कक्षेत राहून काम करत असतात आणि त्याला अनेक दशकांचा इतिहास लाभला आहे. शिवाय अनुभव, वैयक्तिक शिस्त आणि नियामकच्या आधारे तयार झाला आहे. एआयकडे अशा प्रकारची कोणतीही इनबिल्ट क्षमता विकसित नाही. दुसरीकडे ग्रोकमध्ये असणारे सुरक्षा ङ्गिल्टर देखील निरुपयोगी ठरत आहेत. वास्तविक हे ङ्गिल्टर एआय मॉडेलची भाषा, तथ्य, पूर्वग्रह, भेदभाव दृष्टिकोन यास नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात. आता मॉडेलची नवीन आवृत्ती ग्रोक-4 आली आहे. पण त्याने मागील मॉडेलप्रमाणे चुका करू नये, अशी अपेक्षा आहे. उदाहरणार्थ, एआयला प्रशिक्षण देताना त्याच्या डेटा क्वालिटीत सुधारणा करणारे, वैविध्यपणा मजबूत करणारे, हानीकारक मजकूर व्हायरल करण्यास प्रतिबंध करणारे यासारख्या मजबूत सुरक्षा ङ्गिल्टर्सचा वापर करणे आवायक आहे. एआयच्या माध्यमातून बाहेर पडणार्या तथ्यांचा आणि मजकुराचा आढावा घेणे तसेच समीक्षा करीत सुधारणांची प्रक्रिया सतत सुरू ठेवणे देखील तितकेच आवश्यक आहे. ‘अॅडव्हसेरियल’ चाचणी म्हणजे एआय मॉडेलमध्ये चुकीचे मुद्दे मांडत परीक्षा घेणे. मॉडेल्सला आणखी जबाबदार आणि सक्षम होण्यास प्रेरित करण्यासाठी सरकार आणि आंतरराष्ट्रीय संघटनेने देखील पावले उचलण्याची गरज आहे.