Nagar | विकास कामांच्या अजेंड्यावरच निवडणूक रिंगणात : आ. जगताप

नगर, (प्रतिनिधी)- ऐनवेळी निवडणुकीची तयारी करून चालत नसते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी आधीपासूनच तयारी सुरु केली आहे. सुरवातीपासूनच लोकसंपर्क ठेवून त्यांची कामे करण्यावर भर दिला आहे. नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे.
आजपर्यंत केलेल्या विकास कामांच्या अजेंड्यावरच ही निवडणूक लढवत आहे. निवडणुकीसाठी प्रचार सुरु केला असून जनतेची साथ मला मिळत असल्याने निवडणुकीतील विजयासाठी कोणतीही अडचण नसून विजय माझाच आहे. महायुतीमधील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी बरोबर आहेत, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी केले.
आ. जगताप यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे समन्वयक व भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे,
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,
माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, प्रा. माणिक विधाते, नरेंद्र कुलकर्णी, उबेद शेख, अभिजीत खोसे, अविनाश घुले, युवराज पोटे, संजय ढोणे आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी महेंद्र गंधे यांच्या निवासस्थानी महायुती मधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकार्यांची समन्वय बैठक झाली. यामध्ये निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. यावेळी महायुतीचे उमेदवार आ. जगताप व तिन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.





