Pro Kabaddi 2024 : सलग 4 पराभवानंतर तामिळ थलैवाज विजयी, बंगालचा 15 गुणांनी केला पराभव…

Pro Kabaddi 2024 (Bengal Warriorz vs Tamil Thalaivas) : प्रो कबड्डी लीग (पीकेएल 2024) च्या 57 व्या सामन्यात, तामिळ थलैवाजने अखेर त्यांचा पराभवाचा सिलसिला संपवला आणि बंगाल वॉरियर्सचा 46-31 असा पराभव केला.
ரொம்ப சந்தோசம்யா 🥹
தலைவாஸ் படை ஹேப்பி அண்ணாச்சி 😍#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengalWarriorz #TamilThalaivas pic.twitter.com/eukE2Wn9d2
— ProKabaddi (@ProKabaddi) November 16, 2024
सलग 4 सामने गमावल्यानंतर थलैवाजने पहिला विजय नोंदवला असून या विजयासह ते गुणतालिकेत 10व्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. बंगालचा हा सलग तिसरा पराभव आहे.थलैवाजचा नवा कर्णधार नरेंद्र कंडोला याने उत्कृष्ट कामगिरी करत 500 रेड पॉइंट पूर्ण केले.
शनिवारी झालेल्या लढतीत मध्यंतराला तामिळ थलैवाजने 18-16 अशी 2 गुणांची आघाडी घेतली होती. थलैवाज संघाने 43 रेडपैकी 17 तर वॉरियर्स संघाने 43 रेडपैकी 13 यशस्वी रेड केल्या. पकडीतून थलैवाज संघाने 16 तर वॉरियर्स संघाने 10 गुणांची कमाई केली.
Pro Kabaddi 2024 : सात पराभवानंतर गुजरात जायंट्सनं मिळवला विजय, बंगालवर केली मात…
थलैवाजसाठी, विशाल चहलने सुपर 10 सह सर्वाधिक 12 गुण मिळवले. त्याच्याशिवाय नरेंद्र कंडोला आणि मोईन शफाघी यांनाही अनुक्रमे 5 आणि 6 गुण मिळाले. बचावात नितेश कुमारचे 6 गुण आणि आमिर हुसेनचे 7 गुण महत्त्वाचे होते. बंगालकडून विश्वासने 9 आणि नितीनने 8 गुण मिळवले.





