Pro Kabaddi League 2024 : शदलोईचा अष्टपैलू खेळ, हरियाणा स्टीलर्सची दबंग दिल्लीवर मात…

Kabaddi League 2024 (Haryana Steelers vs Dabang Delhi KC) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 21व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने दबंग दिल्लीचा पराभव केला आहे. हरियाणा स्टीलर्सने चमकदार कामगिरी करत सामना जिंकला. यादरम्यान हरियाणा स्टीलर्सने दबंग दिल्ली केसीचा 7 गुणांच्या फरकाने पराभव केला आहे.
मोहम्मदरेझा शदलोई व शिवम पटारे यांच्या दर्जेदार खेळाच्या जोरावर हरियाणा स्टीलर्सने दबंग दिल्ली संघाला 41-34 असे पराभूत करताना विजयाची नोंद केली.
दूध दही का खाणा, यो मेरा हरियाणा 💙
धाकड़ छोरों ने दबंग दिल्ली के ख़िलाफ़ दर्ज की धमाकेदार जीत 💪🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #HaryanaSteelers #DabangDelhiKC pic.twitter.com/S6FuAWgkKj
— ProKabaddi (@ProKabaddi) October 28, 2024
मोहम्मदरेझा शदलोईने अष्टपैलू खेळ करताना सुपर 10 पूर्ण केले. मोहम्मदरेझाने 5 चढाया, 1 बोनस व 4 पकडी असा अष्टपैलू खेळ केला. शिवम पटारेने 5 पकडी तर 3 बोनस अशा 8 गुणांची कमाई केली.
Pro Kabaddi League 2024 : पुणेरी पलटणचा बंगळुरु बुल्सवर वेगवान विजय…
दुसरीकडे दबंग दिल्लीच्या वतीने आशू मलिकने एकट्याने सर्वाधिक 13 गुण घेतले आणि विनयनेही 8 गुण घेतले मात्र खराब बचावामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.





