Video : शेवगाव घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा नेवासा येथे कडकडीत बंद

Updated On:

नेवासा (प्रतिनिधी) – शेवगाव येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणूकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ नेवासा येथे सकल हिंदू समाज बांधवांच्यावतीने कडकडीत बंद ठेऊन निषेध नोंदविण्यात आला आहे. यावेळी नेवासा तहसीलदार कार्यालयावर मोर्चाने जाऊन निवेदन देण्यात आले.

यावेळी निघालेल्या मोर्चामध्ये शिवसेनेचे युवानेते बिट्टू लष्करे, शहर प्रमुख नितीन जगताप, नारायण लष्करे, उमेश ठाणगे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, अँड.मयूर वाखुरे, राजू काळे, अजित नरुला, धनुभाऊ काळे,आकाश एरंडे, धनंजय औटी, शिवा राजगिरे, स्वप्नील मापारी, अशोक ताके, सतीश गायके, कैलास लष्करे, कामगार नेते कृष्णा डहाळे यांच्यासह युवक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेवासा येथील श्री खोलेश्वर गणपती मंदिरापासून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आला. सदरचा मोर्चा मुख्य पेठेतील डॉ.हेडगेवार चौक, छत्रपती संभाजी चौक, औदुंबर चौक मार्गे श्रीरामपूर रोडवरून नेवासा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी कृष्णा डहाळे यांनी या निवेदनाचे वाचन केले.

सकल हिंदू समाजाच्या वतीने युवकांनी आपल्या भावना व्यक्त करून शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणूकीवर झालेल्या दगडफेक घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तर समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

यावेळी निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी निवेदन घेतांना आपल्या भावना लक्षात घेऊन ते वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले.

आणखी संबंधित बातम्या

Raghuveer khedkar : गावगाड्यातील तमाशा महर्षी, लोकनायक झाला पद्मश्री...; 'रघुवीर खेडकर' यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान !

2026-05-25 22:17:02

Raghuveer khedkar : गावगाड्यातील तमाशा महर्षी, लोकनायक झाला पद्मश्री...; 'रघुवीर खेडकर' यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान !

Political News : मोठी उलथापालथ..! राजकीय पक्ष फुटला; 'या' 3 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात खळबळ

2026-05-25 19:43:32

Political News : मोठी उलथापालथ..! राजकीय पक्ष फुटला; 'या' 3 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात खळबळ

Nautapa 2026 : पुढचे 9 दिवस सावधान... अखेर 'नवतपा' सुरू.! 'या' चूका अजिबातच करू नका, अन्यथा तुमच्या जीवावर बेतणार

2026-05-25 17:12:02

Nautapa 2026 : पुढचे 9 दिवस सावधान... अखेर 'नवतपा' सुरू.! 'या' चूका अजिबातच करू नका, अन्यथा तुमच्या जीवावर बेतणार

IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अखेर ‘या’ खात्याच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार

2026-05-25 15:44:23

IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अखेर ‘या’ खात्याच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार

Pakistan news : शांतता चर्चेची पुढची फेरी पाकिस्तानात व्हावी.! पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अपेक्षा

2026-05-24 21:54:08

Pakistan news : शांतता चर्चेची पुढची फेरी पाकिस्तानात व्हावी.! पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अपेक्षा