“माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांमध्ये…”; मितालीची पती सिद्धार्थ चांदेकरसाठी खास पोस्ट

Mitali Mayekar and Siddharth Chandekar | मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा दोघे सोशल मीडियावर परदेशवारीचे फोटो शेअर करताना दिसतात. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.अलीकडेच 14 जूनला सिद्धार्थने वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त मितालीने खास पोस्ट शेअर करत सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत.
मितालीची खास पोस्ट
‘वाढदिवसाच्या शुभेच्छा My Love…आपल्या आयुष्यातील आनंद, वेडेपणा, रात्री उशिरा झालेल्या गप्पा, आपल्या अनप्लॅन्ड ट्रिप्स, घरातील शांतता… अशा माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांमध्ये तू असतोस. तू फक्त माझा नवरा नाहीस, तर माझा जोडीदार, माझा मित्र सर्वकाही तू आहेस आणि तुझ्याबरोबर असेन तरच संपूर्ण जीवन अर्थपूर्ण आहे.
आपल्या आयुष्यात असे काही दिवस असतात जेव्हा आपण एकमेकांबरोबर पोट दुखेपर्यंत हसतो, तर काही दिवस शांततेत घालवतो कारण, तेव्हा संवाद साधण्यासाठी शब्द पुरेसे नसतात. प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तू माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणही पाहिले आहेस आणि मला अगदी गोंधळलेल्या स्थितीतही पाहिलं आहेस. महत्त्वाचं म्हणजे, परिस्थिती कशीही असो तू कायम माझ्यावर तेवढंच प्रेम केलं आहेस.
View this post on Instagram
तुझ्या वाढदिवशी मी फक्त तुझे आभार मानू इच्छिते, तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात सेफ जागा आहेस. नेहमीच अत्यंत प्रेमळ आणि खंबीरपणे तू माझ्या पाठिशी उभा राहतोस, अजून काय हवं. आपल्या आयुष्यातील सगळी स्वप्नं पूर्ण होवोत, आपल्याला नेहमीच रात्री उशिरा काहीतरी वेगवेगळं खायची इच्छा होवो, अनावश्यक भांडणं करून, कॉफी शेअर करून आपण असेच कायम एकत्र राहुयात, आय लव्ह यू… हे प्रेम मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. Happy birthday maa…. (उशिरा पोस्ट शेअर केली कारण आम्ही वाढदिवस सेलिब्रेट करण्यात व्यग्र होतो)’, अशी खास पोस्ट मितालीने सिद्धार्थसाठी लिहिली आहे.
हेही वाचा :





