बिहारमध्ये शिवसेनेनं स्वत:चा कचरा करुन घेतला

पाटणा – बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर एनडीएला अखेर बहुमत मिळाले आहे. यासह बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार सातव्यांदा शपथ घेतील. सत्तारूढ एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत सत्ता काबीज करण्यासाठी कॉंटे की टक्कर पहावयास मिळाली.
एनडीएने थोड्या जागांच्या फरकाने विरोधकांच्या महाआघाडीला मागे टाकत बहुमताचा आकडा पार केला. सर्व २४३ जागांच्या निकालानुसार, एनडीएने १२५ जागा मिळवल्या आहेत. यामध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. तर या निवडणुकीत बिहारमध्ये निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला ०.०५ टक्के मत मिळाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झालं आहे. या निकाल नंतर भाजपाने नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संज्या आज संध्याकाळपासून कंपाऊंडर जवळ बसला असेल. संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात संज्या राऊत करेल ही आम्हाला खात्री आहे. https://t.co/8H2cZK6yJ7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 10, 2020
काय म्हणाले निलेश राणे
‘शिवसेनेनं स्वत:चा कचरा करुन घेतला असून बिहारमध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेची परिस्थिती जशी झालीय तशीच परिस्थिती महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यामुळे होईल’





