एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात FIR ; ‘या’ प्रकरणी जलील यांच्यासह 30 समर्थकांवरही गुन्हा

Imtiyaz Jaleel । महाराष्ट्रात एआयएमआयएमचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य काही नेत्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्तियाज जलील यांच्यासह आणि त्यांच्या 30 समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधाशी संबंधित आहे.
कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा Imtiyaz Jaleel ।
इम्तियाज जलील आणि इतर एआयएमआयएम नेते अमित शाह यांच्या कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध करत होते, त्यामुळे या सर्वांवर कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे MIM कडून झालेल्या आंदोलनात गाढवाचा वापर करत जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आक्षेप घेत इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे 30 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.एमआयएम पक्षाने या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, हे आंदोलन शांततापूर्ण होते आणि जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एमआयएमच्या आंदोलनावर आणि पोलिसांच्या कारवाईवर राजकीय चर्चांना उधाण आले असून या प्रकरणाचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
काय म्हणाले होते अमित शाह ? Imtiyaz Jaleel ।
अमित शाह यांनी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांनी आंबेडकर आंबेडकर आंबेडकर म्हणणे ही आता एक फॅशन झाली आहे असे म्हणत विरोधकांवर टीका केली होती. तसेच येवढ्यावेळा देवाचे नाव घेतले असते तर पुढच्या सात जन्म स्वर्ग मिळाले असते. असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा
राज्यात येत्या काही दिवसात थंडीचा जोर ओसरणार ; ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता ?
“राज्यातील जनतेशी थेट निगडित…” ; खातेवाटपानंतर धनंजय मुंडे यांची खास पोस्ट, अजित पवारांच्या नावाचाही उल्लेख





