“नवनीत राणा मेंटॅलिटीची बाई…कव्हरेज दिले तर डान्सही…” ; इम्तियाज जलील यांची शेलक्या शब्दात टीका

Imtiaz Jaleel on Navneet Rana । लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आता दोन दिवसावर आलंय. त्यातच आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यातच मागच्या दोन दिवसापासून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि एमआयएम यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. त्यातच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील राणा यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलीय.
नवनीत राणा म्हणजे चिप मेंटॅलिटीची बाई Imtiaz Jaleel on Navneet Rana ।
छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे संदिपान भुमरे, चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील या तिन्ही प्रमुख उमेदवारांकडून आज प्रचाराच्या शेवटच्यादिवशी मोठं शक्तीप्रदर्शन केलं जातय. छत्रपती संभाजी नगरच्या पीर बाजारातून एमआयएमच्या वतीने इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ मोठ्या रॅलीचा आयोजन करण्यात आल आहे. या रॅलीत बोलताना, “आपणच पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येणार” असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला. याशिवाय नवनीत राणांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर जोरदार पटलवार केला. काही लोक हे भाजपने भुंकण्यासाठी ठेवले आहेत, नवनीत राणा म्हणजे चिप मेंटॅलिटीची बाई असल्याचं जलील यांनी म्हटलं. त्यामुळे, आता जलील यांच्या टीकेला नवनीत राणा काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागेल.
कव्हरेज दिले तर डान्सही करायला लागेल Imtiaz Jaleel on Navneet Rana ।
भारतीय जनता पार्टीला काही भूकणारे लोक हवे आहेत. याअगोदर हैदराबादचे आमदार भूंकण्यासाठी सोडलं होते, आता तो संपलेला आहे, म्हणून ह्या बाईला सोडलं आहे. नवनीत राणा ही चिप मेंटॅलिटीची बाई आहे. तुमचा धर्म आहे याचा आम्ही आदर करतो, पण हनुमान चालीसा उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच का वाचायची होती. चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ही कोणत्याही इशूला मोठं करते, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी नवनीत राणांवर प्रहार केला.
पुढे या बाईला असं वाटतं की कॅमेरा दिसला की आपली शूटिंग सुरू आहे. ओवैसी साहेब चार टर्म खासदार आहेत, त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पण, नवीन आलेल्या बाईला काही कळत नाही. जर तुम्ही तिला म्हणालात मी कव्हरेज देतो, तर ती डान्स करायलादेखील तयार होईल, असा खोचक टोलाही जलील यांनी लगावला.
हे वाचाल का ?
“…पण असे खूंखार आम्ही घराच्या बाहेर पाळतो” ; नवनीत राणांचे ओवेसींना पुन्हा चॅलेंज





