मुंबई सागा चित्रपटातून इम्रान करणार गुंडांचा खात्मा

मुंबई – बॉलिवुडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता संजय गुप्ता यांनी जेव्हा गॅगस्टार ‘मुंबई सागा’ची घोषणा केली, तेव्हापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर, इम्रान हाश्मी, रोहित रॉय आणि अमोल गुप्ते मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.
Everyone on team MUMBAI SAGA was anxious about how @emraanhashmi
would pull off the deadly cop’s look.
Just look with what style he has pulled it off. pic.twitter.com/BdB2FuYLoB— Sanjay Gupta (@_SanjayGupta) February 6, 2020
दरम्यान, मुंबई सागा चित्रपटाची अभिनेता इमरान हाशमीचा फर्स्ट लुक समोर आला आहे. विशेष म्हणजे यात इमरान एका पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चित्रपटात इमरान एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार हे नक्कीच. हा चित्रपट 1980-90 च्या दशकातील असून तेव्हा बॉम्बे ही मुंबईत बदलत होती.
? gansta !! https://t.co/cF6ezvbOqQ
— Emraan Hashmi (@emraanhashmi) January 13, 2020





