Bollywood News – इमरान खानचा गर्लफ्रेंड लेखासोबतचा फोटो व्हायरल
Updated On:

इमरानने ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या डॅशिंग लूकवर आणि चॉकलेट बॉय इमेजवर मुली फिदा होत्या. त्यानंतर त्याने २००८ मध्ये ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘आय हेट लव्ह स्टोरी’ आणि ‘कट्टी बट्टी’ आणि अशा बऱ्याच चित्रपटात काम केले. मात्र काही काळानंतर त्याने चित्रपटापासून ब्रेक घेतला. असे असले तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी जोडला गेला आहे.
अशात सोशलवर इमरान आणि त्याच्या गलफ्रेंडचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो अभिनेता आमिर खानची लेक इरा खानच्या लग्नातील आहे. आमिरचा इम्रान खान पुतण्या असून इराच्या लग्नातील सेरेमनीतील हा फोटो आहे, या फोटोत इमरान गर्लफ्रेंड लेखासोबत पोज देत आहे.
या फोटो चाहते संमिश्र प्रतिक्रिया देत असून अनेक चाहते प्रश्न विचारत आहे की, अरबाज खानप्रमाणे ४० वर्षांचा इम्रान त्याच्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेल्या त्याच्या प्रेयसीशी लग्न करणार का ? या फोटोवर अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे.
दरम्यान, इमरान १९ वर्षांचा असताना त्याने अवंतिका मलिकला डेट करायला सुरुवात केली. दोघांनीही २०१० मध्ये लग्न केले. मुलगीही झाली. पण कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. लग्नाच्या 8 वर्षानंतर दोघेही 2019 मध्ये वेगळे राहू लागले. अवंतिका आपल्या मुलीसह इम्रानच्या घरातून निघून गेली.






