“टायगर-3’मध्ये सलमानला टक्कर देणार इमरान हाश्मी

सलमान खानच्या सुपरहिट फ्रेंचाइजी “टायगर’चा आगामी चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आहे. “टायगर-3’मध्ये सलमान खानसह अभिनेत्री कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी झळकणार आहे. यात इमरान हा व्हिलनची भूमिका साकारत आहे.
सलमान आणि इमरान यांच्यातील टस्सल पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खानला टक्कर देण्यासाठी इमरान हा जिममध्ये कठोर मेहनत घेत आहे. याचा एक फोटो नुकताच इमरानने चाहत्यांशी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोतून इमरान बायशेपची एक्सरसाइज करत असल्याचे दिसून येते. यात त्याचे बायशेप खुपच जबरदस्त दिसत आहे. हा फोटो शेअर करत इमरानने लिहिले की, JUST ANOTHER ARMS DAY !!
दरम्यान, “टायगर-3’मध्ये इमरान हाश्मी हा एका पाकिस्तानी आयएसआय गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. यामुळे यात इमरान हाश्मीचा वेगवेगळा लुक चाहत्यांना पाहण्यास मिळू शकतो. इमरान साकारत असलेली ही
खलनायकाची भूमिका यापूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप स्मार्ट आणि स्टायलिश असणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाची सुरुवात ही शाहरुख खानच्या “पठाण’ चित्रपटाच्या शेवटापासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.





