मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी.! महापालिकेला करोना लसीचा भासला तुडवडा

नवी दिल्ली – शेजारच्या चीनमध्ये करोनाचा जो नवा अवतार अर्थात व्हेरियंट आढळला आहे, त्यामुळे जगात आणि भारतातही काहीसे काळजीचे वातावरण आहे. हा व्हेरियंट किती धोकादायक असेल याचा विचार आणि तपासणी केली जाते आहे. सध्या चीनमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे. चीनमध्ये अनेक लोकांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. आणि त्यामुळेच आता भारतात देखील प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
अद्याप तरी भारतात परिस्थिती दिलासादायक असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. असं देखील आरोग्य विभाकडून सांगण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे तसेच बूस्टर डोस घेण्याचं आवाहन देखील केंद्र सरकार आणि आरोग्य विभाग करत आहे.
दरम्यान, अश्यातच आता मुंबई महापालिकेला करोना प्रतिबंधात्मक लसीचा तुडवडा भासत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महापालिकेने राज्य सरकारला पत्र देखील लिहलं आहे. केंद्र सरकार आणि आरोग्य विभागने नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आव्हान केलं आहे. पण मुंबई महापालिकेकडे लसीचा तुटवडा भासत असल्याने हे पत्र देण्यात आलं आहे.
मुंबईत सध्या तरी बीएफ 7 व्हायरसचा धोका नाही. बीएफ 7 चा रुग्ण मुंबईत सप्टेंबर मध्ये आढळला होता पण मुंबईकराची हर्ड इम्युनिटी अधिक असल्याने तो पसरला नाही. मुंबईत पहिला आणि दुसरा डोस घेतल्याने 97 टक्के लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार आहे. मात्र, सध्या तरी मुंबईत कोणतंही चिंतेचं वातावरण नसल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे.





