Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात हालचालींना वेग आला असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत सव्वा तास बैठक चालली असून आता बैठक संपली आहे. कालही रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली होती. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधानामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून, उपमुख्यमंत्री कोण होणार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षकडे पद कुणाला मिळणार तसेच अजित पवार यांच्याकडे असलेली खाती कुणाकडे जाणार असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आम्हाला लवकरत लवकर निर्णय घ्यायचा आहे, याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे विधान केले आहे. हेही वाचा : Akola Municipal Corporation : भाजपाची चाल फळाला आली! 15 दिवसांनंतर मिळाला राज्याला पहिला महापौर या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी वर्षा निवास्थानी जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी नेत्यांकडून करण्यात आली असल्याची माहिती मिळत असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचे नाव समोर आल्याचे समजते. यासोबतच अजित पवार यांच्याकडे असलेली सर्व खाती ही राष्ट्रवादी पक्षालाच मिळाली पाहिजे यासाठी नेते आग्रही आहेत. असे असले तरी याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही नेते आहेत त्यांच्या जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. त्यामुळे लोकनेता म्हणून चेहरा नाही. त्यात अजित पवार यांचे दोन्ही सुपुत्र राजकारणात फारसे सक्रीय नाहीत. राष्ट्रवादीतील नेत्यांपैकी कुणाला नेतृत्व दिले तर त्यावरून पक्षातील गटबाजी उफाळून येऊ शकते. त्यामुळे सध्याच्या घडीला सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. पुढच्या महिन्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून, राज्याचा यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प कोण मांडणार यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता अजित पवारांच्या निधनानंतर अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची दाट शक्यता आहे. हेही वाचा : Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबले? ; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा युद्धबंदीचा दावा