Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेत काँग्रेसने महापौर पदाचा आधी दावा केला होता परंतु तो फोल ठरला आहे. बहुमत मिळालेले नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. या महापालिकीसाठी महापाैर पदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता १५ दिवसानंतर राज्यातील २९ पैकी महापालिकांपैकी पहिला महापौर ठरला असून, इतर महापालिकांचे महापौर देखील लवकरच ठरणार आहेत. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडून १५ दिवस उलटून गेले तरी महापौर पदावरून रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच महापौर पदाबाबत मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. त्यानंतर आता वेगवेगळ्या महापालिकेसाठी महापौर निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अकोला महापालिकेत महापौर म्हणून शारदा खेडकर यांची निवड झाली असून, त्या प्रभाग क्रमांक १५ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. हेही वाचा : Sanjay Raut : “महाराष्ट्र धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही, तरी…”; संजय राऊतांचा नेत्यांवर संताप, म्हणाले “सुनेत्रा पवारांनी …” ८० जागा असेलेल्या अकोला महापालिकेची निवडणूक मोठ्या अटीतटीची झाली. कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. पण भाजपने राजकीय चाल करत ३८ नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा १, शिंदेंच्या शिवसेनेचा १, आणि २ अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळवत सत्तास्थापन केली. महापौर निवड प्रक्रियेत ऐनवेळी एमआयएमचे 3 नगरसेवक तटस्थ राहिले. शारदा खेडकर कोण आहेत? शारदा खेडकर यांनी भाजपकडून अकोला महापालिकेत प्रभाग क्रमांक १५ मधून निवडणूक लढवली. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा ४५ मतांनी पराभव करत विजय मिळवला. महापौर निवडीनंतर मोठा राडा भाजपच्या महापौर शारदा खेडकर यांची अकोला महापालिकेच्या महापौर पदी निवड झाल्यानंतर सभागृहात मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे. अकोला महापालिकेत कोणत्या गटाचे किती उमेदवार विजयी? एकूण जागा : 80 बहुमताचा आकडा : 41 भाजप : 38 काँग्रेस : 21 उबाठा : 06 शिंदे सेना : 01 अजित राष्ट्रवादी : 01 शरद राष्ट्रवादी : 03 वंचित : 05 एमआयएम : 03 अपक्ष : 02 हेही वाचा : Land Registry Rules: ‘या’ राज्यात जमीन नोंदणीचे नियम बदलले ; आजपासून ‘हे ‘कागदपत्र अनिवार्य