GST Council – 2 दिवसांनी म्हणजेच 7 ऑक्टोबरला रोजी पुन्हा एकदा GST कौन्सिलची बैठक होणार आहे. GST कौन्सिलची 52 वी बैठक शनिवारी म्हणजे 2 दिवसांनी म्हणजेच 7 ऑक्टोबरला होत आहे. शनिवारी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या महत्त्वाच्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांवरील १८ टक्के जीएसटी कमी करून ५ टक्के केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भरड धान्यावरील जीएसटीचे दरही कमी होऊ शकतात.
याशिवाय अनेक मोठ्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये विमा आणि ऑनलाइन गेमिंगवरील जीएसटीवरही चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर बैठकीमुळे अनेक उद्योगांना मोठा फटका बसू शकतो. बैठकीत, कर्जाच्या बदल्यात कंपन्यांनी ऑफर केलेल्या कॉर्पोरेट गॅरंटीवर 18 टक्के जीएसटी लागू केला जाऊ शकतो.
या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते
शनिवारी होणार्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवरील 28 टक्के कराच्या अंमलबजावणीचा आढावा तसेच बाजरी आणि इतर वस्तूंवरील कर पुनर्रचनेच्या प्रलंबित प्रस्तावांवर निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे, कर पुनर्रचना आणि GST अपीलीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेच्या प्रलंबित प्रस्तावांवर देखील विचार करू शकते.
बाजरीला प्रोत्साहन देण्यावर सरकारचे फोकस लक्षात घेऊन, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील GST परिषद बाजरी-आधारित खाद्यपदार्थांना GST मधून सूट देण्यास मान्यता देऊ शकते.
कौन्सिल इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी जीएसटी दराचा आढावा घेण्याची शक्यता आहे, ज्यावर सध्या 18 टक्के जीएसटी आहे. सरकार ते 5 टक्के कमी करू शकते.
वस्तू आणि सेवा कराच्या फिटमेंट कमिटीने ईव्ही बॅटरी आणि तंबाखू उत्पादनांवरील कर कमी करण्याची उद्योगाची मागणी फेटाळली आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, जीएसटी कौन्सिलची बैठक ७ ऑक्टोबरला होणार आहे. उद्योगाने सिगारेटवर एकसमान अतिरिक्त भरपाई उपकर/बिडीवरील भरपाई उपकर/ (धूररहित) स्मोकलेस तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त भरपाई उपकर/किंवा ७० मिमी पर्यंतच्या सिगारेट स्टिक्सवर कमी भरपाई उपकराची मागणी केली होती. जे, सुत्रांच्या म्हणण्यानुसार, फिटमेंट कमिटीने फेटाळले आहे.