Sudhir Mungantiwar : ठाकरेसेनेचे खासदार राष्ट्रहितासाठी एनडीएसोबत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे – सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar : ठाकरेसेनेचे काही खासदार वेगळा गट स्थापन करुन याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

Sudhir Mungantiwar : ठाकरेसेनेचे काही खासदार वेगळा गट स्थापन करुन याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
दुसरीकडे ठाकरेसेनेचे खासदार राष्ट्रहितासाठी एनडीएसोबत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटले आहे. मुनगंटीवार यांनी पक्ष फोडाफोडीच्या प्रश्नावरुन काँग्रेसवर सडकून टीका केली. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.
मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, राष्ट्रहिताचे जेव्हा निर्णय येतात तेव्हा काँग्रेसने विरोध केला. कलम 370 असेल, तीन राज्यांच्या संदर्भात काश्मीरचे विभाजन, राम जन्मभूमीला विरोध केला, राम सेतूच्या संदर्भात विरोध, अफजल खानाची कबर हटवू नये अशी भूमिका घेतात, तीन तलाक विरोधातील निर्णयाला विरोध, जीएसटीला सुरुवातीला एकमताने मंजूर केला, नंतर दुसऱ्या दिवशी विरोध केला.
जीएसटी तुम्हीच आणला होता ना? मग त्याला चांगला आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोध केला नव्हता. तेव्हा मोदींनी एवढेच सांगितले होते की, जीएसटी आणताना राज्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. ती काळजी घेतली ना. आपण 14 टक्के ग्रोथ रेट दिला. तेवढी नुकसान भरपाई आपण दिली. मला वाटते की, काँग्रेसची विरोध करण्याची सवय आहे, अशा परिस्थितीत (Sudhir Mungantiwar) जे चांगली लोकं आहेत, त्यांनी भाजप किंवा एनडीएला मदत करण्याची भूमिका घेतली तर त्याचे स्वागत केले पाहिजे.
तसेच, जुन्या गोष्टी आठवत नाहीत का? शिवसेनेला फोडले कुणी? छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक कुठून आले? तुम्ही अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा राष्ट्रप्रेमी, देशभक्त असणाऱ्या नेत्यांचे भाजपच्या काही खासदारांना पैसे देऊन सरकार पाडले. आता तुम्हाला उपरती होत आहे. कर्णाला जेवढी उपरती झाली नाही तेवढी तुम्हाला उपरती होत आहे.
संसद भवनमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी नोटांचे बंडल दाखवले. तुम्ही सरकार पाडण्यासाठी अशा विविध योजना केल्या. इथे तर देश घडवण्यासाठी आमचे सरकार आहेच. पण या देशामध्ये देशहिताचे न्याय देणारे कायदे मंजूर व्हावे म्हणून कुणी पाठिंबा देत असतील तर त्यात काय गैर आहे?, असा सवाल त्यांनी (Sudhir Mungantiwar) केला.






