निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Budget 2024 । अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पापूर्वी संसद भवनात मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. प्रत्येक वर्गाच्या स्वतःच्या अपेक्षा असतात. शेतकरी, उत्पादन क्षेत्राशी संबंधित लोक आणि लघुउद्योग आशेने वाट पाहत आहेत. असे मानले जात आहे की नवीन कर प्रणालीमध्ये बदल होऊ शकतात.
#WATCH | Presenting Union Budget, Finance Minister Nirmala Sitharaman says, “The Government will launch a scheme to provide internship opportunities to 1 crore youth in 500 top companies with Rs 5000 per month as internship allowance and one-time assistance of Rs 6000.” pic.twitter.com/v95f2PKTwV
— ANI (@ANI) July 23, 2024
Budget 2024 । निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- हा अर्थसंकल्प सर्वांच्या विकासाचा आहे.
- हा विकसित भारताचा रोडमॅप आहे.
- ऊर्जा सुरक्षेवर सरकारचे लक्ष.
- रोजगार वाढवण्यावर सरकारचा भर. रोजगार वाढवणे ही सरकारची प्राथमिकता आहे.
- नैसर्गिक शेती वाढवण्यावर भर.
- 32 पिकांसाठी 109 वाण लाँच करणार.
- कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य.
- मोफत रेशनची व्यवस्था ५ वर्षे सुरू राहील.
- यावर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद.
- रोजगारासाठी सरकार 3 मोठ्या योजनांवर काम करणार आहे.
- मुद्रा कर्ज मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे
- शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर सवलत
- सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी, आता फक्त 6% भरावे लागणार आहे
- स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये ३ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. ३ ते ७ लाख रुपयांच्या कमाईवर ५ टक्के आयकर भरावा लागेल. 7 ते 10 लाख रुपये उत्पन्न असल्यास 10 टक्के दराने आयकर आकारला जाईल. 10 ते 12 लाख रुपयांच्या करपात्र उत्पन्नावर 15 टक्के दराने आयकर आकारला जाईल. 12 ते 15 लाख रुपयांच्या करपात्र उत्पन्नावर 20 टक्के आयकर आकारला जाईल. 15 लाखांपेक्षा जास्त करपात्र उत्पन्नावर 30 टक्के दराने आयकर आकारला जाईल.
- विदेशी कंपन्यांवरील कॉर्पोरेट कर कमी, 40% ऐवजी 35% भरावा लागेल
- बिहारमध्ये 3 एक्सप्रेसवेची घोषणा.
- बोधगया-वैशाली द्रुतगती मार्ग बांधला जाईल.
- पाटणा-पूर्णिया एक्स्प्रेस वेचे बांधकाम.
- बक्सरमध्ये गंगा नदीवर दुपदरी पूल.
- बिहारमध्ये एक्सप्रेस वेसाठी 26 हजार कोटींची तरतूद.
- विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांचे स्किल मॉडेल कर्ज.
- प्रथमच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पीएफ
- नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य
- पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना सरकार दोन वर्षांसाठी दरमहा ३०० रुपये अतिरिक्त पीएफ देणार आहे.
- स्थानिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे असुरक्षित शैक्षणिक कर्ज उपलब्ध होईल.
- युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. 30 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळणार आहे.
- यासाठी अर्थसंकल्पात 2 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते.
- केंद्र सरकार ४.१ कोटी तरुणांना रोजगारासाठी पाच योजना आणणार आहे.
- येत्या 5 वर्षात सरकार 2 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.
- सरकार येत्या 5 वर्षांत 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार आहे. एका वर्षाच्या इंटर्नशिप दरम्यान प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
- शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता
- रोजगार आणि कौशल्ये
- सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय
- उत्पादन आणि सेवा
- शहर विकास, नागरी विकास
- ऊर्जा सुरक्षा
- पायाभूत सुविधा
- नवोपक्रम, संशोधन आणि विकास
- पुढच्या पिढीतील सुधारणा
- काशीच्या धर्तीवर बोधगयामध्ये एक कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे.
- अर्थसंकल्पात बिहारमधील पर्यटनावर भर देण्यात आला आहे.
- नालंदामध्ये पर्यटनाचा विकास
- बिहारमध्ये राजगीर पर्यटन केंद्राचे बांधकाम
- पूर आपत्तीवर बिहारसाठी 11000 कोटी रुपयांची तरतूद
- कॅन्सरची 3 औषधे स्वस्त होणार
- मोबाईल फोन चार्जर स्वस्त होणार
- विजेच्या तारा आणि एक्स-रे मशीन स्वस्त होतील.
- कर्करोगाच्या तीन औषधांवर कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.
- सोन्या-चांदीवरील सीमाशुल्क कमी करण्यात आले आहे.
हे वाचले का ?





