उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांचे मिळणार कर्ज; कोणत्या विद्यार्थ्यांना होणार फायदा?

Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. यंदाही जनतेला या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा आहेत. त्यानुसार आता या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरूण, रोजगार यांच्यासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना 10 लाख रूपयांचे उच्च शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाऊचर दिले जाणार
कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने त्यांच्या उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज जाहीर करण्यात आले आहे. यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाऊचर दिले जाणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. यामुळे कोणत्याही योजनांचा लाभ घेता न येणाऱ्या विद्यार्थांसाठी ही दिलासा देणारी माहिती आहे. Budget 2024 |
त्यानुसार आता देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकार आर्थिक मदत करेल. तसेच 7.5 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा देण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत बदल केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच योजनांसाठी पंतप्रधान पॅकेज जाहीर केले. त्यांचा उद्देश रोजगार आणि प्रशिक्षण मजबूत करणे हा आहे. यासाठी सरकारने दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. Budget 2024 |
हेही वाचा:





